खानिवडे: वसई तालुक्यात मांडूळ साप तस्करीप्रकरणी तीन जणांना वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. वनपरिक्षेत्र मांडवी व वनपरिक्षेत्र भाताणे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली असून एक कारसुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. सोमनाथ पोपट आडके (वय 49 ) चंद्रकांत नागरगोजे (वय 42) अरुण लांडगे,(वय 62 )या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
14 जानेवारी रोजी मांडूळ सापाच्या विक्रीसाठी काही साप तस्कर हे मांडवी वनपरिक्षेत्र हद्दीतील कशीद कोपर गावात येणार असल्याची गुप्त खबर वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याप्रमाणे वनपरिक्षेत्र मांडवी व भाताणे यांनी माहिती मिळालेल्या प्रमाणे पाळत ठेवली होती.
तसेच इतर कर्मचाऱ्यांनी गस्त ठेवली होती. यामध्ये तपास करताना तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मांडूळ जातीचा दुर्मिळ साप व एक कार जप्त करण्यात आली आहे.