Uddhav Thackeray On BMC Mayor: मुंबई महापालिकेचा निकाल पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतर आता संख्याबळाचा सर्वांना अंदाज आला आहे. भाजप जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी त्याला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत जागा मिळालेल्या नाहीत. यामुळे जरी फटका बसला असली तरी शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर अजून चांगली आहे. त्यामुळे शिंदेंनी आपली सर्व निवडून आलेली सेना ही पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीबाहेर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना एक गुगली टाकून दिल्यानं अजून मुंबईच्या राजकारणातील ट्विस्ट शिल्लक असल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलताना जर देवाची इच्छा असेल तर आपलाच महापौर बदेल असे सुचक वक्तव्य केलं आहे.
या वक्तव्यानंतर शेजारी उभे असलेले आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांच्या कानात काहीतरी सांगितलं.
मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची भेट घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'हा विजय तुमचाच आहे आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत. ही लढाई सोपी नव्हती. भाजपला वाटलं की आपण शिवसेना संपवली. मात्र त्यांनी कागदावरची शिवसेना संपवली. ते जमिनीवरची शिवसेना संपवू शकले नाहीत. त्यांनी लालूच साम दाम दंड भेद सर्व काही वापरलं.
त्यांनी गद्दारही घेऊन गेले. मात्र ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपण तो जरी आकडा गाठू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून तो विजय मिळवलेला आहे. तो विजय त्यांनी मुंबई गहाण टाकण्यासाठी मिळवला आहे. हे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधीही माफ करणार नाही. मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही सर्वजण निष्ठेने लढलात.
त्यांनी ज्या सोयी सुविधा ठेवल्या होत्या त्या आपण देऊ शकलो नाही. आपल्याकडे तन आणि मन आहे त्यांच्याकडे फक्त धन आहे. मात्र आपल्याकडे जी शक्ती आहे त्याच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडला आहे. ही एकजूट अशीच ठेवा जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुमचा अभिमान वाटेल.'
उद्धव ठाकरे बोलताना शेवटी म्हणाले की, 'पैसे मिळत असतानाही माझे आई वडील, दादा ताई विकले गेले नाहीत. माझ्या भविष्यासाठी हे विकले गेले नाहीत ही तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.