Omraje Nimbalkar file photo
मुंबई

Omraje Nimbalkar: "मी कोणताही निर्णय घेतलेला नाही..." ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना थेट फोन! नेमकी काय झाली चर्चा?

शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार आज शिवसेना शिंदे गटात अधिकृतरीत्या सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरून संवाद झाला.

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray Omraje Nimbalkar phone call

मुंबई: शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार आज शिवसेना शिंदे गटात अधिकृतरीत्या सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरून संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात काय झाली चर्चा?

उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांची भूमिका जाणून घेतली, ओमराजे यांचे नेमकं म्हणणं काय आहे, हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतलं. आपण पक्षासोबत आहोत, आपण कुठलाही निर्णय घेतला नाही, असं ओम राजे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. आपणच मला मोठं केलं आहे, आज मी खासदार आहे ते पक्षामुळे आणि तुमच्यामुळे; त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सहा खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता

ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार आज शिवसेना शिंदे गटात अधिकृतरीत्या सहभागी होणार असल्याचे समजते. याबाबतची कारवाई पूर्ण होऊन रविवारी त्यांचा एकत्रितपणे फोटो आणि स्वाक्षरीचे कागद बाहेर येण्याची शक्यता आहे.

पक्षातून बाहेर पडून दोन तृतीयांश खासदारांचा गट म्हणून स्थापन होण्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया त्यांनी पूर्वीच पार पाडल्याचे समजते. याची औपचारिक घोषणा रविवारी केली जाणार असल्याचे शिवसेना शिंदे गटातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचे शिवसेना शिंदे गटात विलीनीकरण झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा खासदारांची संख्या ७ वरून १३ वर जाणार आहे.

दरम्यान, ओमराजे आज कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपला पुढचा राजकीय निर्णय घेणार आहेत. पुणे इथून ते धाराशिव मधल्या गोवर्धनवाडीकडे रवाना झाले असून सायंकाळी चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT