Uddhav Thackeray Criticise On India Vs Pakistan Match :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी अजून पहलगामंच रक्त सुकलेलं नाही असं सांगत पाकिस्तान सोबत खेळण्याला विरोध दर्शवला. त्यांनी ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी भारत पाकिस्तान सामन्यावरून पत्रकार परिषद घेऊन टीका केली. त्यांनी भारत - पाक युद्ध आता थांबलं असं अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी जाहीर करावं. ऑपरेशन सिंदूरवेळी भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका करण्यात आली होती. त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यानं पाकिस्तानी प्रशिक्षक, खेळाडूंना भारतात आमंत्रित केलं होतं. त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता बीसीसीआय पाकिस्तानसोबत सामना खेळत आहे. आता नेमकं काय बदललं आहे हे पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होतं. मात्र आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतोय.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, देशभक्तीचा हा व्यापार सुरू आहे. देशभक्तीची ही थट्टा आहे. व्यापारापुढं त्यांना देशाची देखील काय किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना विचारायचंय की तुम्ही हे युद्ध संपलं आहे असं जाहीर करणार का. हे गधडे सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणाले होते.
आपली पाकिस्तानविरूद्धची भूमिका काय हे स्पष्ट केलं पाहिजे, ते म्हणाले होते रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. आता एखाद्या खेळावरती बहिष्कार टाकला तर असं कोणतं मोठं संकट ओढवणार नाहीये. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही अस ठणकावून सांगितलं पाहिजे.
उद्धव ठाकरे यांनी आज मला सुषमा स्वराज यांची आठवण येतेय असं सांगितलं. ते म्हणाले, आताचे जे परराष्ट्रमंत्री आहेत जयशंकर कुठला जय आणि कुठला शंकर नुसतं नावात शंकर आहे. बाकी काय करतात हे माहित नाही मला. ते सुषमा स्वराज यांचे सचिव होते. आता जर सरदार पटेल पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता.