Bombay High Court file photo
मुंबई

Thane Municipal Committee Elections: ठाणे महापालिका समित्यांच्या निवडणुकादोन महिन्यांत घ्या; उच्च न्यायालयाचे आदेश

स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण समितीसह पाच समित्यांच्या निवडणुका रखडल्या; स्वीकृत नगरसेवकांची निवडही पूर्ण करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिंदे च्या शिवसेनेला हायकोर्टाने मोठा झटका दिला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने रखडलेल्या पालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण समितीसह पाच प्रमुख समित्यांच्या सदस्य आणि सभापतीं पदाच्या रखडलेल्या निवडणुका आठ आठवड्यात घ्या, असे आदेश दिले.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पालिकेच्या कारभारात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण समितीसह एकूण पाच प्रमुख समित्यांच्या सदस्यांच्या व सभापतींच्या निवडणुका अद्याप पार पडलेल्या नव्हत्या.

याशिवाय महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवडही प्रदीर्घ काळापासून रखडवण्यात आली होती. या दिरंगाईविरोधात ॲडव्होकेट सागर कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून भारतीय जनता पक्षाने या सत्तेला पाठिंबा दिलेला आहे.

मात्र, राजकीय कारणांमुळे किंवा जाणीवपूर्वक स्वीकृत नगरसेवक आणि विविध वैधानिक समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या जात नसल्याचा दावा केला. याची खंडपीठाने गंभीर दखल घेत पुढील दोन महिन्यांत पालिका समित्यांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT