Sachin Ahir News pudhari
मुंबई

Sachin Ahir Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.० चा पहिला वार... ठाकरेंचे विश्वासू सचिन अहिर यांना शिंदेंकडून उपसभापतीची उमेदवारी

Anirudha Sankpal

Sachin Ahir News: विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी एकप्रकारे ऑपरेशन टायगर ३.० सुरू केलं असून त्याचा पहिला वार हा सचिन अहिर यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विधन परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सचिन अहिर हे ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार असून त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं राज्यात अजून मोठे भूकंप येणे बाकी आहेत याचे संकेत मिळत आहेत.

सचिन अहिर हे शिवसेना ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू आमदारांपैकी एक मानले जात होते. ते वरळीमधून देखील निवडून आले होते. मात्र आदित्य ठाकरे राजकारणात येणार म्हटल्यावर त्यांनी आपला मतदार संघ त्यांच्यासाठी सोडला होता. त्यानंतर ते विधन परिषदेवर गेले होते. मात्र आता त्यांना शिंदे गटाने उपसभापती पदाचा आपला उमेदवार करून आपरेशन टायगर ३.० चा आपला पहिला वार केला आहे.

यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात आता खासदार फोडले मात्र अजून मोठे धक्के शिल्लक आहेत असे सुतोवाच दिलेच होते. त्याप्रमाणे शिंदे यांनी आता ठाकरेंच्या आमदारांना हात घातला आहे.

शिंदेनी वरळीत आदित्य यांची केली गोची?

उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून तिथून जे खासदार फुटले त्यांच्या मतदार संघात जाऊन ते सभा घेत आहेत. मात्र त्याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मुंबईत त्यांचा अत्यंत विश्वासू आणि ठाकरेंसाठी त्याग करणाऱ्या सचिन अहिर यांनाच गळाला लावून मोठी खळबळ उडवून दिली आहे.

जर सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वरळीत उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध एक तगडा उमेदवार मिळणार आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीची निवडणूक अत्यंत रंजक आणि आदित्य ठाकरेंसाठी राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीकोणातील निवडणूक ठरण्याची दाट शक्यता आहे.

सुषमा अंधारे मुंबईला रवाना

सुषमा अंधारे या देखील मुंबईसाठी रवाना झाल्या आहे. त्यांना सचिन अहिर यांचा अनेकवेळा फोन आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र सुषमा अंधारे या कुठेही जाणार नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतं आहे.

विशेष म्हणजे अहिर यांच्या उमेदवारीचा अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची देखील उपस्थिती होती. एकनाथ शिंदे हे दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार असून सचिन अहिर हे शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT