Amravati political news| ठाकरे गटाला धक्का: जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचा राजीनामा, शिंदे गटात करणार प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्यावर विदर्भाची मोठी जबाबदारी सोपवली आहे
Amravati political news| ठाकरे गटाला धक्का: जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचा राजीनामा, शिंदे गटात करणार प्रवेश
Published on
Updated on

अमरावती : जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून, अचलपूर-मेळघाटचे जिल्हाप्रमुख नरेंद्र उत्तमराव पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते लवकरच आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

पक्षाचे मुख्य नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात नरेंद्र पडोळे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमरावती जिल्ह्यातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील कामात सतत अडथळे निर्माण केले जात असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अचलपूर तालुक्यातून पक्षाला मोठे मताधिक्य मिळवून देऊनही कार्यकर्त्यांची सातत्याने उपेक्षा केली जात असल्याची खंत त्यांनी पत्रात बोलून दाखवली.

Amravati political news| ठाकरे गटाला धक्का: जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचा राजीनामा, शिंदे गटात करणार प्रवेश
Anand Paranjpe : माजी खासदार आनंद परांजपे यांचे शिवसेनेत स्वगृही पुनरागमन

नरेंद्र पडोळे हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. १९८५ पासून त्यांनी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशी विविध संघटनात्मक पदे सांभाळली आहेत. याशिवाय ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे संचालक आणि पंचायत समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या भागात संघटना वाढीसाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, पक्ष सोडताना त्यांनी आपण पद सोडत असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील राहूनच पुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Amravati political news| ठाकरे गटाला धक्का: जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचा राजीनामा, शिंदे गटात करणार प्रवेश
Parbhani Shiv Sena UBT: परभणीत ठाकरे सेनेचा बंडखोरांना 'चेकमेट', नव्या शिलेदारांची नियुक्ती

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर नरेंद्र पडोळे यांनी शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्यावर विदर्भाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीनंतर बच्चू कडू यांनी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला मोठे खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच दर्यापूर येथील सहकार नेते सुधाकर भारसाकळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला होता आणि आता नरेंद्र पडोळे यांच्या रूपाने ठाकरे गटाचा मोठा चेहरा शिंदे गटात जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news