सुषमा अंधारे. Pudhari
मुंबई

Shiv Sena UBT Crisis : घरात घुसून जाब विचारण्‍याचा शिवसैनिकांना अधिकार : सुषमा अंधारेंचा बंडखोर खासदारांना थेट इशारा

पक्षनेतृत्त्‍व संपर्कात नाहीत असे म्‍हणाणारेच होते नेत्‍यांच्‍या संपर्कात

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena UBT Crisis : "आम्‍ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींना नवे चिन्‍हे घेवून सामोरे गेलो होतो. मतदार व शिवसैनिकांनी 'मशालं या चिन्‍हाला मतदान गेले होते. हे मतदान एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना नव्‍हते. शिवसैनिकांनी केलेल्‍या मतदानामुळे ९ खासदार व २० आमदार निवडणूक आले. आता जो कोणी दगाफटका करणार असेल तर त्‍याला घरात घुसून जाब विचारण्‍याचा अधिकार शिवसैनिकांना आहे," अशा शब्‍दांमध्‍ये ठाकरे शिवसेना गटाच्‍या प्रवक्‍त्‍या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन टायगरव आपले मत व्‍यक्‍त केले.

'ते' मतदान एकनाथ शिंदे किंवा फडणवीसांच्या कार्यकर्त्यांचे नव्हते!

सुषमा अंधारे यांनी विरोधकांसह पक्षातील संभाव्य बंडखोरांवर हल्लाबोल करताना स्पष्ट केले की, "आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना पूर्णपणे नवीन चिन्ह घेऊन सामोरे गेलो होतो. मतदारांनी आणि शिवसैनिकांनी 'मशाल' या चिन्हाला मतदान केले होते. हे मतदान एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे नव्हते, तर ते अस्सल शिवसैनिकांचे मतदान होते. याच मतदानाच्या जोरावर ९ खासदार आणि २० आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आता जर कोणी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत."

'पक्षनेतृत्व संपर्कात नाही' म्हणणारेच नेत्यांच्या संपर्कात!

"पक्षनेतृत्व संपर्कात नाही, अशी ओरड करणार्‍यांसाठी पक्षनेतृत्‍वाला विधानपरिषदेत निवडणुकीतील मतदानासाठी संपर्क साधला होता," असा टोला अंधारे यांनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील यांचे नाव घेवून लगावला. हा पक्षनेतृत्वाच्या संपर्काचा विषय नसून, काहींची वृत्ती ही 'गुलाल तिकडे चांगभले' अशी असल्याचा घणाघात त्यांनी केला. शांतीत क्रांती नव्हे, तर स्वार्थासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

संजय देशमुखांना राज्यमंत्रीपद खुणावतंय!

यावेळी बोलताना त्यांनी वतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्यावर थेट निशाणा साधला. "संजय देशमुख यांना आता राज्यमंत्रीपद खुणावत आहे, कोणाच्या मनात काय चालले आहे हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे," असे अंधारे म्हणाल्या.

सर्वांचे फोन नंबर जाहीर करणार!

महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आवाहन करताना सुषमा अंधारे यांनी एक मोठा इशारा दिला. "ज्यांना असं वाटतंय की आपण फार मोठे झालो आहोत किंवा शहाणे आहोत, त्या सर्वांचे फोन नंबर आम्ही शिवसैनिकांना देत आहोत," असेही सुषमा अंधारे यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT