Supriya Sule On Merger: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पत्रकार परिषदेत फुल स्टॉप दिला. त्यांनी ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या माझ्या भावासोबत दिवंगत अजित पवार यांच्यासोबत सुरू होत्या. माझा भाऊ गेला अन् त्या चर्चांना फुल स्टॉल लागला. त्यानंतर आमच्याकडून कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत असं म्हणत आता या चर्चांचा कंटाळा आला आहे. आमच्याकडून हा विषय संपला असल्याचं उद्विग्नपणे सांगितलं.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडणार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. शरदचंद्र पवार गट हा एनडीएमध्ये जाणार कोणाला मंत्रीपद मिळणार याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत. सध्या विलिनीकरणाबाबत पवार कुटुंबाकडून कोणतीही चर्चा सुरू नाहीये असं सांगितलं.
त्यांनी अजित पवार हयात होते त्यावेळी याबाबत चर्चा झाली होती अन् ती जगजाहीर झाली होती. असं सांगत ती चर्चा भावासोबतची होती आता भाऊच नाही म्हटल्यावर कोणती चर्चा नाही असं भावून होत सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं.
सुप्रिया सुळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडोमोडी घडत आहेत. त्याबाबत दिल्लीत देखील याचा देशावर होणारा परिणाम याबाबत चर्चा सुरू आहे. त्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे नेतृत्व तसेच शिवसेना उबाठा अन् तृणमूल काँग्रेसचे देखील खासदार जेपीसीच्या माध्यमातून चर्चा करत आहेत. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भेटीगाठी होत असतात असं म्हणत कथित बैठकांबाबत खुसाला केला.
पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी डीलिमिटेशनबाबत देखील आपली भूमिका काही प्रमाणात स्पष्ट केली. याच डीलिमिटेशन बीलसाठीच सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादीच्या ८ खासदारांची गरज असल्याचा तर्क गेल्या काही दिवसांपासून दिला जात होता. त्यासाठीच हे विलिनीकरणाचा घाट घातला जात असल्याचे विश्लेषण अनेक जाणकारांनी केलं होतं.
आता याबाबत सुप्रिया सुळे यांनी वैयक्तिकरित्या आपली भूमिका काय असू शकते याची कल्पना दिली. त्या म्हणाल्या की, डीलिमिटेशनबाबत उबाठाचे अरविंद सावंत आणि आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बोललो आहे. अरविंद सावंत यांनी पक्षनेतृत्वाशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार असं सांगितलं होतं.
माझं म्हणाल तर मला ढोबळमानाने डीलिमिटेशन ठीक वाटलं. कारण आमचे मतदार संघ हे २० ते २५ लाखांचे झाले आहेत. इतके मोठे मतदार संघ कोणत्याही खासदाराला मॅनेज करणं अवघड आहे. जर सरसकट जागा ५० टक्क्यांनी वाढल्या तर डीलिमिटेशनला पाठिंबा देण्याबाबत विचार करू असे सुचक उत्तर दिलं.