Sunil Tatkare (File photo)
मुंबई

Sunil Tatkare meets CM Devendra Fadnavis- सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटल्याचा दावा

Sunil Tatkare meets CM Devendra Fadnavis -

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवाळी सणानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, तटकरे यांनी मंगळवारी बारामती येथील अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहिली. त्यानंतर, पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती.

सुनिल तटकरे हे बुधवारी दुपारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चाही झाली. ही भेट केवळ दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे सांगतानाव यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा तटकरे यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यासंदर्भातील दावे फेटाळले जात आहे. मात्र, एकेकाळी विलीनीकरणाची कुठलीही चर्चा झाली नव्हती, असा दावा करणाऱ्या तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या जुन्या वक्त्यव्यावरून घूमजाव केला होता.

अजित पवार असते तर आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या असत्या, असे सांगत नवाच पवित्रा घेतला. त्यामुळे, तटकरे यांनी दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी बारामतीत पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट आणि आता लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्यांची भेट घेतल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत. लागोपाठ दोन दिवसांतील या भेटींकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT