Siddharth Chandekar Fraud Call pudhari
मुंबई

Siddharth Chandekar Fraud Call: स्वर्गात आकाशगंगा... म्हणत सिद्धार्थ चांदेकरनं फ्रॉड कॉलरची चांगलीच फिरकी घेतली Video व्हायरल

Anirudha Sankpal

Siddharth Chandekar Fraud Call Funny Video: अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळं भारतात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. लोकं गॅस एजन्सीच्या बाहेर हवालदील होत रांगा लागवत आहेत. तर हॉटेल व्यावसायिकांनी आपलं शटर डाऊन केलं आहे. नागरिकांची अशी कुंचबना होत असतानाच काही नतद्रष्ट लोकांना आपदा में अवसर दिसत आहे. त्यामुळं गॅस एजन्सीच्या नावानं फ्रॉड कॉल येण्याचा महापूर आला आहे.

असाच एक कॉल अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला आला होता. त्यानं या फ्रॉड कॉलरची चांगलीच फिरकी घेतली. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅस एजन्सीमधून बोलतोय असा हा फ्रॉ कॉल आला होता. हुशार सिद्धार्थनं या फ्रॉड कॉलरचीच फिरकी घेत त्याला आपल्या तालावर चांगलंच नाचवलं.

सिद्धार्थ काय म्हणाला....?

महानगर गॅसमधून बोलतोय असा कॉल हिंदीतून आल्यानंतर सिद्धार्थने तुम्ही मराठीत बोला असा आग्रह धरला. त्यावर मराठीतून बोलू शकणार नाही असं उत्तर आलं. त्यावेळी सिद्धार्थने महाराष्ट्राची गॅस एजन्सी अन् मराठी बोलणार नाही असं कसं म्हणत त्या फ्रॉड कॉलरलाच एक ऑफर दिली.

त्यानं तुम्ही एक वाक्य मराठीतून बोलून दाखवा मी तुम्हाला मेसेज करतो असं सांगितलं. त्यानंतर सिद्धार्थनं 'स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी काठ, घाटाला पायऱ्या शंभर, झाला आनंद आली बाहर' असं वाक्य म्हणण्यास सांगितलं. त्यावेळी या फ्रॉड कॉलरनं कोणीतरी गळाला लागेल या आशेनं मराठी बोलण्यास सुरूवात केली. त्यानं तोडक्या मोडक्या मराठीतून हे वाक्य बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सिद्धार्थ या सगळ्याची मजा घेत होता.

सावध राहण्याचा सल्ला

विशेष म्हणजे सिद्धार्थनं प्रसांगावधान राखून या फ्रॉड कॉलचा व्हिडिओच रेकॉर्ड करत तो इन्स्टाग्रामवर टाकला. आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यन, गॅसचा तुटवला आणि लोकांची हवालदीलता पाहून काही लोकं यांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. गॅस सिलिंडरचा काळा बाजार जोरात सुरू आहे. अप्रत्यक्षरित्या सिद्धार्थनं अशा फ्रॉड कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याने कुठलीही सरकारी संस्था तुम्हाला व्हॉट्स अॅपवर चॅट करायला सांगत नाही असं सांगत अशा फ्रॉड कॉलपासून सावध राहण्यास सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT