Shweta Tiwari Tukaram Mundhe Video Pudhari
मुंबई

Shweta Tiwari Video: कोल्ड ड्रिंक्ससोबत आलं झुरळ! 'मुंढे जी, तुम्ही कुठे आहात?', श्वेता तिवारीची थेट तुकाराम मुंढेंना हाक

Shweta Tiwari Tags Tukaram Mundhe: ऑनलाइन मागवलेल्या कोल्ड ड्रिंक्ससोबत झुरळ आल्याचा आरोप करत अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shweta Tiwari Tags Tukaram Mundhe: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने ऑनलाइन मागवलेल्या कोल्ड ड्रिंक्ससोबत झुरळ आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर श्वेताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे अर्थात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या तुकाराम मुंढे हे खाद्यपदार्थ विकणारी हॉटेल्स, कँटीन आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर आस्थापनांवर कारवाई करत असल्याने चर्चेत आहेत. अनेक नागरिक सोशल मीडियावर त्यांच्या तक्रारींसाठी मुंढे यांना टॅग करत आहेत. आता या यादीत अभिनेत्री श्वेता तिवारीचाही समावेश झाला आहे.

Shweta Tiwari Tags Tukaram Mundhe

श्वेता तिवारीने एका क्विक-कॉमर्स ग्रोसरी डिलिव्हरी अॅपवरून काही कोल्ड ड्रिंक्स मागवल्याचे सांगितले आहे. मात्र, डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्यासोबत एक झुरळही आल्याचा तिचा आरोप आहे. श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये घरात झुरळ फिरताना दिसत असून श्वेता त्याबाबत बोलताना दिसते. तिने संबंधित डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला टॅग केले. त्याचबरोबर तिने तुकाराम मुंढे यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

श्वेताने व्हिडिओमध्ये गंमतीशीर पण संताप व्यक्त करणाऱ्या अंदाजात म्हटले की, कोल्ड ड्रिंक्ससोबत झुरळही आले आहे आणि ते आता घरभर फिरत आहे. त्यानंतर तिने तुकाराम मुंढे यांना उद्देशून, “मुंढे जी, आता आमच्या घरात झुरळं येत आहेत. तुम्ही कुठे आहात? कृपया लक्ष द्या,” असे आवाहन केले.

श्वेताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. खाद्यपदार्थ आणि पेयांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे सध्या अन्न सुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत असल्याने श्वेताने थेट त्यांनाच टॅग केल्याने चर्चा रंगली आहे.

दरम्यान, श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स 2’ या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. श्वेता तिवारी या शोमुळेही सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मात्र, आता कोल्ड ड्रिंक्सच्या डिलिव्हरीसोबत झुरळ आल्याच्या तिच्या दाव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रकरणावर संबंधित डिलिव्हरी प्लॅटफॉर्म किंवा इतर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते आणि या तक्रारीची चौकशी होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT