मुंबई पुढारी ऑनलाईन : 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाममधील काश्मिर पिडितांच्या प्रश्नांबाबत सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमाचे राजकारणामध्येही पडसाद पहायला मिळत आहेत. हिम्मत असेल तर पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेउन दाखवा, असे आव्हान आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिले.
काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणाऱ्या 'काश्मीर फाइल्स' हा चित्रपट करमुक्त करणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यासंदर्भात बाेलताना संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाने पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये आणून अखंड हिंदूस्थान निर्माण करू असं सांगितले, आम्ही त्याची वाट पाहतोय. नुसते बोलू नका, त्याविषयी काम करा, असा टाेलाही त्यांनी लगावला.
सिनेमा काढून प्रचार आणि राजकारण आम्ही केलं नाही. कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं याचं भान जर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाही धोक्यात आहे, असेही ते म्हणाले, आम्ही बनवलेल्या ठाकरे फिल्मवरसुद्धा टॅक्स होता, या सिनेमासाठी आम्ही कधीच टॅक्स फ्री मागणी केली नव्हती. ठाकरे सिनेमा टॅक्स फ्री नव्हता. 'काश्मीर फाइल्स' हा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याच्या वादग्रस्त मुद्द्याला प्रत्यत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले,.
फडणवीसांच्या टीकेवर उत्तर देताना राऊत म्हणाले, "मी वकील नाही आणि कोणाची वकिलीदेखील करत नाही. मी माझ्या पक्षाचे मत मांडतो. काश्मिरी नेत्यांना आम्ही भेटलो आहे. फक्त टुरिझमसाठी नाही गेलो. मी स्वत: अमन आणि शांतीसाठी काश्मिरला जाऊन आलो आहे. पण राजकारण केलं नाही" यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारने जी होळीविषयक नियमावली जाहीर केलेल्या नियमांविरोधी असणाऱ्या विरोधी पक्षाचा चांगलाच समाचार घेतला. हे नियम लोकांच्या हिताकरिता ठेवले आहेत विरोधी पक्षाने याविषयी राकारण करू नये, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा