मुंबई: ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी डॉक्टर आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबीय होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पवार यांची तब्येत उत्तम आहे. डॉक्टरांनीही सगळे नॉर्मल असल्याचे सांगितले आहे. शनिवारी डिस्चार्जही होईल.
त्यांची प्रकृती उत्तम आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, खासदार मिलिंद देवरा, यांनी शरद पवारांची भेट घेतली.