Sharad Pawar In Hospital pudhari
मुंबई

Sharad Pawar In Hospital: ...बाबा ऐकत नाहीत, सुप्रिया सुळेंची पोस्ट; शरद पवारांना पुन्हा ब्रिज कँडी रूग्णालयात करण्यात आलं दाखल

डिहायड्रेशनमुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Anirudha Sankpal

Sharad Pawar In Hospital: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रिज कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली असून त्यांनी 'बाबांना कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डिहायड्रेशनमुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बाबांना वेग कमी करून कमी प्रवास करावा लागेल. बाबा ऐकत नाहीत. बाबा त्यांच्या कामावर जास्त प्रेम करतात. तुमच्या काळजीबाबत आणि सदिच्छांबाबत आभार.' अशी पोस्ट केली आहे.

प्रवास टाळण्याचा दिला होता सल्ला

शरद पवार यांना मध्यतंरी देखील ब्रीज कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास झाला होता. शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यांना ७ नोव्हेंबर रोजी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

यावेळी डॉक्टर प्रीतम समदानी यांनी शरद पवार हे उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. वयाचा विचार करता त्यांना औषधोपचार सुरू ठेवण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यांना सामान्य नागरिकांनी या आजारपणात पाळाव्यात अशा सर्व सुचना करण्यात आल्या होत्या. त्यांना प्रवास टाळणे आणि लोकांच्या भेटीगाठी कमी करण्यास सांगण्यात आले होते.

मात्र काही दिवसातच शरद पवार यांनी लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाला जोमात सुरूवात केली होती. याचवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची देखील चर्चा जोर धरू लागली होती. मात्र या सर्वांवर विराम लावून विलिनीकरणाची कोणती चर्चा नाही असं सुप्रिया सुळे यांनी सांगून त्यावर पडदा टाकला होता.

सुळे यांनी राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार हा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ शकते. त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं संकेत दिले होते. यानंतर देखील राजकीय चर्चांना उधाण आले होते.

यानंतर शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार अशी देखील चर्चा त्यांची प्रकृती पाहून सुरू झाली होती. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार राजकारणातून निवृत्ती होणार नाहीत असे वक्तव्य केलं होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून अजून बराच काळ शिल्लक असल्याचे सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT