Savitri Bridge Pudhari
मुंबई

Savitri Bridge: सावित्री पुलावर पुन्हा धोक्याची घंटा; एक्सपान्शन जॉईंटला दोन दिवसांत दुसऱ्यांदा खड्डा

अपघाताचा धोका कायम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे देखभालीकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

महाड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री पूल २०१६ मध्ये दुर्घटना घडल्यानंतर नवीन पूल निर्माण करण्यात आला मात्र या नवीन पुलाच्या एक्सपान्शन जॉईंटला पुन्हा एकदा दोन दिवसात दुसऱ्यांदा खड्डे पडून दुभागल्याने सावित्री पुलावर पुन्हा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून पुन्हा सावित्री पूल दुर्घटना घडण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग विभाग वाट बघते का? काय असा प्रश्न या मार्गावर प्रवास करणाऱ्यांकडून विचारला जात आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १८ वर्ष चालू असूनसुद्धा अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यातच २ ऑगस्ट २०१६ साली याच सावित्री नदीवर असणाऱ्या जुना पुलावरून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या राजापूर बोरिवली व जयगड मुंबई या एसटी बस पैकी राजापूर बोरवली बसमधील व जयगड मुंबई मधील४२ व दोन खाजगी वाहनांना अपघात होऊन २ प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्यापैकी 26 जणांचे मृतदेह सापडले व १४ जण बेपत्ता होते ही शोध मोहीम तब्बल ११ दिवस चालू होती.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुना पूल पडल्यानंतर त्याच्या बाजूला नवीन पूल उभारण्यात आला मात्र या नवीन पुलावर वारंवार एक्सपान्शन जॉइंट दुभागण्याचे प्रकार घडत असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व पुलाची निर्मिती करणारे कंपनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करताना दिसून येत नाही यापूर्वी देखील या पुलावरील एक्सपांशन जॉईंट दुभंगला होता तेव्हा शिवसेना ठाकरे पक्षाचे महाड तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला तातडीने दुरुस्ती करण्याबाबत इशारा दिला होता.

तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी तातडीने दुरुस्ती केली मात्र या पुलावरून ७० ते ८० टन वजनाचीअवजड वाहने वारंवार जात असल्याने या ठिकाणच्या एक्सपान्शन जॉइंट पुन्हा एकदा दोन दिवसात दुसऱ्यांदा दुभंगल्याने पुन्हा एकदा याच सावित्री पुलावर गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून पुन्हा सावित्री पूल दुर्घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट दुभंगला आहे.

त्या ठिकाणी एक मोठा लोखंडी अँगलवर आला असून त्यामुळे रात्रीच्या सुमारास मोटरसायकल पुढील टायर त्या रोड मध्ये अडकल्यास त्या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने व पुलाची निर्मिती करणाऱ्या कंपनीने दुभंगलेल्या एक्सपान्शन जॉईंटला नेमकी कोणत्या पद्धतीने तात्पुरती मलमपट्टी केली? चा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सावित्री पुलावर पुन्हा २ ऑगस्ट २०१६ सारख्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तात्पुरती मलमपट्टी

महाड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता अमोल महाडकर यांना याबाबत विचारले असता संबंधित कंपनीला त्याची तातडीने दुरुस्ती करण्यास सांगितले मात्र तात्पुरती मलमपट्टी केल्यानंतर पुन्हा एकदा या एक्सपेंशन जॉईंटला मोठ्या प्रमाणावर भगदाड पडल्याने व लोखंडी रॉड वरती आल्याने अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT