Missing Link: मिसिंग लिंकवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; वेगमर्यादा ओलांडणाऱ्या, अवजड वाहनांनी वाहतूक केल्यास कारवाई होणार

या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे दुर्घटना स्थळाची पाहणी केली.
Missing Link
Missing Link Pudhari
Published on
Updated on

प्रशांत गोपाळे

खोपोली: मिसिंग लिंक नवीन मार्गामुळे वेळेची मोठी बचत होत असली, तरी अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे नियम धाब्यावर बसवून वाहने पळवत असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच गुरुवारी मध्यरात्री वेगाच्या भरात झालेल्या भीषण अपघातात एका चालकाला आपला जीव गमवावा लागला.

या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे दुर्घटना स्थळाची पाहणी केली.

Missing Link
Cyber Crime: ७.४२ कोटींच्या फसवणुकीच्या देशभरातून ४२ तक्रारी दाखल; सायबर फसवणुकीसाठी बँक खाती देणारे रॅकेट उघड

सुरक्षिततेचा उपाय म्हणून बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर तसेच आतल्या भागात तातडीने हाय-स्पीड कॅमेरे कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांवर थेट डिजिटल पद्धतीने दंडात्मक कारवाई होणार आहे.

मिसिंग लिंग वाहन चालकांसाठी खुल केल्यापासून अवजड वाहने जात आहेत. वाहनांचा स्पीड जास्त असल्याने अपघात मालिका सुरू झाली आहे.

मिसिंग लिंकवर सध्यातरी अवजड आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही अनेक टेम्पो व ट्रकचालक नियम मोडून या मार्गावर प्रवेश करत आहेत. नुकत्याच गुरुवारी मध्यरात्री वेगाच्या भरात झालेल्या भीषण अपघातात एका चालकाला आपला जीव गमवावा लागला. घटनेची प्रशासनाने दुर्घटनास्थळी पाहणी केली.

Missing Link
Mankhurd Subway Waterlogging: मानखुर्द सबवेचा पावसाळी त्रास कायमचा संपणार; १४.८६ कोटींच्या जलवाहिनी प्रकल्पाला मंजुरी

बोगद्यांमध्ये अत्याधुनिक ओव्हरस्पीड कॅमेरे

वाहनांच्या अनियंत्रित वेगामुळे वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, या मार्गातील चारही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक ओव्हरस्पीड कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांवर थेट डिजिटल पद्धतीने दंडात्मक कारवाई होईल तसेच ट्रक,टेम्पो आदि अवजड वाहनांना बंदी असूनही मिसिंग लिंकवरून वाहतूक केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news