मुंबई

Sassoon Dock Modernization: ससून डॉकचे होणार आधुनिकीकरण; फिनलंडच्या कंपन्यांसोबत राज्य सरकारचा करार

मुंबईतील ऐतिहासिक मासेमारी बंदराला जागतिक दर्जा देण्याची तयारी; तंत्रज्ञान, रिसायकलिंग आणि आधुनिक सुविधांवर भर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकचे आधुनिकीकरण करून त्याला जागतिक दर्जाचे मासेमारी बंदर बनवण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी फिनलंडमधील तीन आघाडीच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाने फिनलंडच्या हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रिसायकल या कंपन्यांशी हा महत्त्वपूर्ण करार केला.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हणाले, ससून डॉक हे देशातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असून महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय अर्थव्यवस्थेत याचा मोठा वाटा आहे. या बंदरात सध्या सुमारे 1,560 नोंदणीकृत यांत्रिक नौका आहेत आणि दरवर्षी सरासरी 50,000 ते 60,000 मेट्रिक टन माशांचे उत्पादन येथे होते.

बंदराच्या ठिकाणी फिनलंडमधील कंपन्यांच्या सहकार्याने कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा आणि जुन्या मासेमारी जाळ्यांचे रिसायकलिंग यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनचा वापर करून बंदर अधिक कार्यक्षम बनवले जाणार आहे.

प्रकल्पाचे फायदे

पर्यावरण रक्षण: समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

कार्यक्षमता: आधुनिक तंत्रज्ञानामुळे मासेमारी आणि लिलाव प्रक्रिया अधिक वेगवान होईल.

मच्छिमारांना सोयी: नेट-मेंडिंग शेड्स, कार्यशाळा आणि पिण्याच्या पाण्याची सोय यामुळे मच्छिमारांचे जीवन सुसह्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT