Women Day Special Stories: लावणी कलाकारांची शिक्षणाकडे वाटचाल; कलेसोबत पदवी-पदव्युत्तर शिक्षणाची जिद्द

रंगमंचावर लावणीची परंपरा जपत शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार; अनेक कलाकार पदवी, बारावी ते पीएचडीपर्यंत घेत आहेत शिक्षण
लावणी कलाकारांची शिक्षणाकडे वाटचाल
लावणी कलाकारांची शिक्षणाकडे वाटचालPudhari
Published on
Updated on

पुणे : सुवर्णा चव्हाण

परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले..; पण लावणी नृत्यकलेने कलाकार म्हणून जगण्याची नवी वाट दिली... मात्र, शिक्षणाची इच्छा मनात कायम होती... मग, काय? तिने कलेसह शिक्षणाची वाट शोधली अन्‌‍ आज ती कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. रंगमंचावरही अस्सल मराठमोळी लावणी सादर करत मने जिंकत आहे... ही कहाणी आहे लावणी कलाकार अमिता यांची.

लावणी कलाकारांची शिक्षणाकडे वाटचाल
Women Day Special Stories: ‘त्याने‌’ सोडले म्हणून काय झाले...‌‘ती‌’ जिद्दीने जगतेय!

अमिता यांच्यासारखे आज कित्येक युवा लावणी कलाकार महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लावणी कला जोपासत शिक्षण घेत आहेत. कोणी पीएच.डी. पूर्ण करत आहे, तर कोणी बारावीचे शिक्षण घेत आहे. कोणी वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. तर कोणी व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणत लावणी कलाकारही मोठ्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने शिकत आहेत.

लावणी कलाकार पूनम दीपक रूपवते म्हणाल्या, परिस्थितीमुळे मला कलेची वाट मिळाली; पण या कलेनेच मला कलाकार म्हणून ओळख मिळवून दिली आहे. मी सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (औंध) येथे वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. शिक्षण घेण्यासाठी कुटुंबीयांचा पाठिंबा आहे.

लावणी कलाकारांची शिक्षणाकडे वाटचाल
Women Day Special Stories: जिगरबाज एकल महिलांचा संघर्ष; संसाराचा गाडा एकटीने हाकणाऱ्या सिंगल मदर्सची प्रेरणादायी कहाणी

पूनम रूपवते

आज रंगमंचावर कला सादर करताना खूप आनंद वाटतो. कारण, आमच्या लावणी सादरीकरणाला राज्यभरातील रसिक भरभरून दाद देतात. ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षणही महत्त्वाचे आहे. म्हणूनच कलेसह शिक्षणासाठी वेळ काढून बारावीचा अभ्यास करत आहे. लावणीला आदर द्यावा, असे अस्मिता पुणेकर यांनी सांगितले.

लावणी कलाकारांची शिक्षणाकडे वाटचाल
Principal Insult Mumbai: सी-लिंकवर मुख्याध्यापकाला ‘पाकिस्तानी’ म्हणत अपमान; मालाडमधील शिक्षकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अस्मिता पुणेकर

प्रत्येकीला कलेसह शिक्षण पूर्ण करावे, असे वाटते. याच विचाराने मीही शिक्षणाकडे वळले. मी वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. मी सकाळी महाविद्यालयाला जाते आणि कार्यक्रमांसाठीही वेळ काढते. मनात जिद्द असेल, तर आपल्या स्वप्नांसाठी आपण नक्कीच मेहनत करतो आणि वेळ काढतो. मीही तेच करते. प्रतीक्षा गायकवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news