Sanjay Shirsat Pudhari
मुंबई

Maharashtra Political : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा दावा

येत्या तीन-चार महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यताही व्यक्त केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विधान परिषद निकालानंतर शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद वाढले असताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी येत्या तीन-चार महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचा दावा केला आहे. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये वादंग सुरू झाले आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता मंत्री संजय शिरसाट यांनी येत्या तीन-चार महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद नाही. कोणतीही धुसफूस नाही. पण नवनाथ बन यांनी पातळी पाहून टीका करावी. अन्यथा त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे का, असा सवाल आम्हीही उपस्थित करू शकतो, असे शिरसाट म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बरीच चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन आहेत, असे सांगत संजय शिरसाट यांनी ते पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात, असे संकेत दिले. तसेच पुढील वर्ष हे शिवसेनेचे असल्याचेही भाकीत त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT