Sanjay Raut Political Earthquake: संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत एक मोठा दावा केला आहे. देशात जानेवारी महिन्यात एक मोठा राजकीय भूकंप येणार असल्याचं भाकित त्यांनी वर्तवलं आहे. सध्या भूगर्भातील हालचाली सुरू असून जानेवारीत राजकीय भूकंप येणार असल्याचा दावा त्यांनी केला. याचबरोबर त्यांनी शिवाजी पार्क येथील सीजेपीच्या आंदोलनाचा उल्लेख करून देखील लोकांमध्ये चीड पाहिली असून माध्यमेही याला जागा देत आहेत. देशातील हवा बदलत आहे असं सांगितलं.
संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चाबाबत पत्रकार परिषदेतून माहिती दिली. त्यांनी आम्ही मोर्चाच्या मार्गात बदल केला आहे. जो ठरलेला मार्ग आहे त्यात बदल केला आहे. तो मार्ग अडचणीचा वाटतोय. याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे.
संजय राऊत शिवाजी पार्क येथील आंदोलनाबाबत भाष्य करताना म्हणाले, 'लोकांची चीड पाहिली. शेकापनेही आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस डावे पक्ष मविा असा आयोगाविरूद्धचा प्रचंड मोर्चा असेल तयारी झाली आहे.
राऊत पुढे म्हणाले की, गोदी मीडिया देखील सरकार विरोधातल्या आंदोलनाला जागा देते तेव्हा कळते की देशातील हवा बदलत आहे. मोदी पदावर राहत नाहीत. जर राहिले तर संपूर्ण सरकार बदलावं लागणार आहे. संघाला आता मोदी शहांचे ओझे झाले आहे. मोदी शहांसोबतच कुमारांना देखील जावं लागणार आहे.'
राऊत यांनी राजकीय भूकंप येणार असल्याचं भाकित देखील वर्तवलं. ते म्हणाले, 'आता भूगर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या भूकंपापूर्वीच्या हालचाली आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत देशात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. फडणवीस यांची उपपंतप्रधान म्हणून निवड व्हावी अशी संघाची इच्छा आहे. तेच मोदींचे वारसदार अशी संघाची भूमिका आहे. आंदोलनाला परवानगी नाकराली. लोक चिडले तर तुम्हाला पळवून पळवून मारतील.'