सत्ताधार्यांना बाळासाहेब ठाकरे यांची भीती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा का झाकला आहे. अटल बिहार वाजपेयी यांचे पुतळा झाकला आहे का?, असा सवालही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला.
Sanjay Raut on unopposed election
मुंबई : "निवडणूक आयोग काहीही करणार नाही याची खात्री असल्यानेच आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली," अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ५) माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. सत्ताधाऱ्यांच्या 'बिनविरोध' निवडीच्या प्रयत्नांसह निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, पोलिस अधिकारी उमेदवारांच्या घरी जात आहेत. उमेदवारांना बळजबरीने गाडीत टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी नेले जात आहे. हे चित्र समोर आल्यावरही निवडणूक आयोग गप्प का? याचाच अर्थ त्यांना आमची भीती वाटत आहे. आयुष्यभर पाठीत खंजीर खुपसण्याचेच काम त्यांनी केले आहे."
. "विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत, मग ते अहवालात का आले नाही? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याप्रमाणे पार्थ पवार प्रकरणात तहसीलदारांचा बळी दिला, तशीच कारवाई आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर होईल," असा आरोपही त्यांनी केला.
निवडणूक काळात पुतळे झाकण्याच्या कारवाईवर राऊत यांनी संताप व्यक्त केला. "सत्ताधाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंची इतकी भीती का वाटते? त्यांचा पुतळा का झाकला जात आहे? मग अटल बिहारी वाजपेयींचा पुतळा झाकला आहे का? आमच्या आणि त्यांच्याही बॅनरवर बाळासाहेबांचे फोटो आहेत, मग ते पण झाकणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शाखा भेटी एक सभाच आहे. संयुक्त सभांना शक्ती लावण्यापेक्षा एकच सभा शिवतीर्थावर होईल. नाशिकला संयुक्त सभा आहे. यावेळेला शिवसेना आणि मनसेला मतदान होईल बंडखोराला मतदान होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जे विधानसभा आणि लोकसभेला झाले, ते पुन्हा घडू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.