Sanjay Raut File Photo
मुंबई

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबरमध्ये 'उलथापालथ' होणार : संजय राऊत

भाजप आणि त्‍यांचे मित्र पक्ष मत घोटाळ्याशिवाय जिंकू शकत नाहीत

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut On Shiv Sena Party And Symbol Case : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नोव्हेंबर महिन्यात मोठी उलथापालथ होईल, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्‍यमांशी बोलताना केला. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी 'घोटाळे' (Scams) केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

आम्हाला न्यायदेवता न्याय देईल

या वेळी खासदार राऊत म्‍हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर महिन्यात उलाथापालथ होईल. देशाचे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्‍हाबाबत खटला सुरु आहे. आम्हाला न्यायदेवता न्याय देईल आणि तो जर न्याय मिळाला तर राज्‍याच्‍या राजकारणात उलथापालथ होईल. दिल्लीमध्ये उलथापालथकरण्याची क्षमता महाराष्ट्राच्या नेतृत्वात पूर्वी होती, आता ती नाही." अशा शब्दात त्यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला.

बारामतीत रात्री पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केले. "अजित पवारांनी बारामतीमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी घोटाळेच केले. रात्री पोलिसांच्या गाडीतून पैसे कसे वाटले गेले. बँका कशा उघड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी माहिती आहे. साठ लाख मतदान लोकसभा विधानसभेत वाढले हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेत अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झाले पाहिजे.या चर्चेत जर ते सहभागी झाले तर संविधान लोकशाही अधिक बळकट होईल अजित पवार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी ते त्यात सहभागी होत नाहीत, असा आरोपही त्‍यांनी केला.

हे घोटाळ्याशिवाय जिंकू शकत नाहीत

राहुल गांधी यांनी मतांचा अधिकार आणि मत चोरी हा विषय लोकांच्या घरोघरी पोहोचवला आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सत्तेतील पक्ष हे वेगळ्या पद्धतीने काही घोटाळा करू शकतील का, त्या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे. कारण हे घोटाळ्या शिवाय जिंकू शकत नाही. निवडणुका या निष्पक्ष व्हाव्या ही आमची भूमिका आहे, असेही राऊत म्‍हणाले.

त्यांच्या क्लबच्‍या मैदानात कबूतर खाना करावा

भारतीय संविधानामध्ये काबुतर खाणे व्हायलाच पाहिजेत असे म्‍हटले आहे का, असा सवाल करत लोकांच्या आरोग्याला त्रास होणारा ज्या गोष्टी आहेत लोकांना अडचणीत आणणाऱ्या लोकांची प्रकृती बिघडवणाऱ्या आजार निर्माण करू शकणाऱ्या गोष्‍टी हटविल्‍या पाहिजेत, असे स्‍पष्‍ट करत मरीन लाईन्सला एक लाइन्स क्लब निर्माण झाला आहे. ग्रँड मेडिकल जिमखाना होता तो जैन समाजाने घेतला. त्याच्या मैदानात कबूतर खाना करावा. आम्ही तिकडे कबुतरांना दाणे घालायला येऊ. आम्ही सुद्धा मानवतावादी आहोत, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंमुळे सरकारला शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल

शनिवारी आम्‍ही हंबरडा मोर्चा काढला. राज्‍य सरकारलाला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. मोर्चात उद्धव ठाकरे यांनी विचारलेला प्रश्‍नावर सरकारला उत्तर द्‍यावे लागले, असे सांगत उद्धव ठाकरे मुख्‍यमंत्री असताना त्‍यांनी एका झटक्यात शेतकऱ्यांच्या कर्ज माफ केलं. करोना आकाळात महाराष्ट्राला जीवदान दिलं त्यांना हतबल मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे स्वतः किती लाचार आहेत हेच मंत्री बावनकुळे दाखवत आहेत, अशी टीकाही त्‍यांनी केली.

एकनाथ शिंदे विधान अमित शहा यांच्या कंपनीतले नोकर

मागील अडीच वर्षा सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍नांसाठी उद्धव ठाकरेंनी अनेक आंदोलन केली. त्‍यांचे डोळे फुटले आहेत का का कानाचे पडदे पडले आहेत. बहुतेक यांच्या डोळे फुटले आहेत. ते अमित शहा यांच्या कंपनीतले नोकर आहेत. यांची बेनामी कंपनी आहे त्या कंपनीतल्या लाचार नोकर आहेत कालचा हंबर्डा मोर्चा यांनी पाहिला असता तर त्यांना कळलं असतं. शिवसेना हा या महाराष्ट्रातला सर्वात पहिला क्रमांकाचा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्याची तुम्हाला भीती वाटते त्या भीती पोटी कुठेही वक्तव्य आहे, असे प्रत्‍युत्तर त्‍यांनी एकनाथ शिंदेंना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT