

Sanjay Raut On India Victory :
भारतानं पाकिस्तानचा पराभव करत आशिया कपवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर देशभरात या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. सत्ताधारी भाजपनं देखील या विजयाला ऑपरेशन सिंदूर २.० अशी उपमा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विजयानंतर टीम इंडियाचं अभिनंदन करणारे ट्विट केले.
यावरून आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली आहे. संजय राऊत यांनी हा सामना राष्ट्रभक्तांनी पाहिल नाही असं सांगत स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मोहसीन नक्वी यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यावरून देखील टीम इंडिया आणि बीसीसीआयवर टीका केली. याचबरोबर त्यांनी तुम्ही काय देशाला मूर्ख बनवत आहात का असा प्रश्न देखील विचारला.
संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत कालच्या भारत पाकिस्तान फायनल सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, 'कालचा सामना हा राष्ट्रभक्तांनी पाहिलेला नाही. अनेक ठिकाणी सामना दाखवण्याचा प्रयत्न हाणून पाडला. पीव्हीआरनं माघार घेतली.'
यानंतर संजय राऊत यांनी आशिया क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यासोबत या समितीत भाजपचे देखील नेते आहेत असा दावा केला. त्यांनी, 'याच मोहसीन नक्वीसोबत तुम्ही सुरूवातीला फोटो काढले. हस्तांदोलन केलं. तुमचं मैदानावरील रूप आणि आतलं रूप वेगळं आहे. देशाला तुम्ही मूर्ख बनवत आहात का. तुम्ही त्यांच्यासोबत चहा घेतला. नाष्टा केला.'
संजय राऊत यांनी कालचा सामना का खेळला असा सवाल देखी केला. तुम्ही कालचा सामना खेळायला नको होता असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हुताम्यांच्या रक्ताचा अपमान असल्यांच देखील सांगितलं.
बीसीसीआयमध्ये, भारतीय संघात महाराष्ट्राचे खेळाडू दिसत नाही असं म्हणत त्यांनी बीसीसीआयवर देखील टीका केली. ते म्हणाले, 'जय शहा आल्यापासून बीसीसीआय, भारतीय संघात महाराष्ट्र कुठं दिसतं नाही. कधी काळी संघात शुद्ध महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश असायचा. आता ते खेळाडू दिसत नाहीत. हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसानं स्वतःला विचारयला हवा. बीसीसीआयमधून महाराष्ट्र पद्धतशीरपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. असंही राऊत म्हणाले.
सूर्यकुमार यादवनं बक्षीसाची रक्कम सैन्याला देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर देखील संजय राऊत यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'तुम्ही खेळलातच का.... बक्षीसाची रक्कम काय असते. भारत - पाकिस्तान प्रत्येक सामन्याचं मानधन द्या. मिळालेला प्रत्येक पैसा दान करा त्या पैशाला शिवू देखील नका. असं राऊत म्हणाले.
त्यांनी विजयानंतर भाजप आणि संघवाले ट्रेंड चालवत आहेत असा आरोप देखील केला. ते म्हणाले, 'पाकिस्तानसोबत खेळताना राजकारण आणू नका असं तुम्हीच म्हणता. मात्र तिलक, बिलक हे काय आहे.