Sanjay Raut Invites Fadnavis: शनिवारी १८ जुलै रोजी नागपुरात रामनगरमधील राम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. फडणवीसांच्या घराजवळ हा कार्यक्रम असल्यानं त्यांना आमंत्रण देणे हे आमचं कर्तव्य असल्याचं सांगितलं. असं खोचक आमंत्रण देऊन संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. शिवसेनेने राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी आंदोलन सुरू केलं आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, नेता म्हणून नाही तर आम्ही फडणवीसांना एक राम भक्त म्हणून आमंत्रित करत आहोत. तसेही देवेंद्र फडणवीस हे १९९२ च्या कारसेवेत सहभागी झाल्याचा दावा करतात. त्याचा आम्हाला अभिमान देखील आहे. त्यामुळं फडणवीस यांच्यासारख्या रामभक्ताला रारक्षा पठण करण्यासाठी आम्ही निमंत्रित करावं अशी आमची इच्छा आहे. त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं आम्ही त्यांचे स्वागत करू.'
एवढंच नाही तर संजय राऊत यांनी नागपुरातील सर्व हिंदूत्ववादी संघटना, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रण दिलं आहे. राम मंदिराची चोरी झाली ती राम सेवकांच्या भावनांना तडा देणारी आहे. त्याचा धक्का फडणवीसांना देखील बसला असेल. त्यामुळं आम्ही लोकांना जागृत करून जे रामाचे सेवक आहेत त्यांना सर्वांना सहभागी व्हाव अशी विनंती केली आहे. त्यात फडणवीसांचा देखील समावेश आहे.
संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत डीलिमिटेशन विधेयकाबाबत देखील भाष्य केलं. त्यांनी सर्व राज्यांना ५० टक्के जागा वाढल्या आणि सरकार त्या संदर्भातील भूमिका घेऊन संशोधन संदर्भात प्रस्ताव आणला तर त्याबद्दल चर्चा होऊ शकते. इंडिया ब्लॉकमधील कोणताही पत्र एकटेपणाने निर्णय घेणार नाही. शिवसेना तसा निर्णय घेणार नाही. एनसीपी तसा निर्णय घेणार नाही. काँग्रेसही तसा निर्णय घेणार नाही. आम्ही सर्व मिळून हा निर्णय घेऊ.
तुम्ही सतत राष्ट्रवादी किंवा शिवसेना डीलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देईल का विचारत आहात. असा कुठलाही निर्णय झालेला नाही. सुप्रिया सुळे यांनी देखील हे स्पष्ट केलं असून जर सुधारित प्रस्ताव आला तर इंडिया ब्लॉकचे सर्व पक्ष एकत्रित बसून त्यावर सामुहिक निर्णय घेतील. कोणताही पक्ष एकटा निर्णय घेणार नाही.