Sachin Waze Case Update: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे प्रकरणाराला एक वेगळं वळण लागलं आहे. सचिन वाझेला विशेष न्यायालयाने धक्कादिला असून एएनआय कडून केस डायरी मागवून घेण्याची विनंती कोर्टाने फेटाळून लावली आहे. सचिन वाझेची याचिका फेटाळल्यामुळं त्याला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला. NIA ला त्यांची केस डायरी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्याची वाझेंची मागणी होती. त्यानंतर स्टेशन डायरी सादर करण्याचीही मागणी केली होती. मात्र विशेष न्यायालयाने या दोन्ही मागण्यासंदर्भात केलेली वाझेंची याचिकाच फेटाळून लावली. सचिन वाझे हे मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी आहेत.
विशेष न्यायालयाचे जज चकोर एस बाविसकर यांनी या प्रकरणातील गुन्हे हे गंभीर आणि संवेदनशील असून या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. कोर्टाने याची पुरवणी चार्जशीट देखील १० ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आल्याचे नमुद केले.
न्यायालायने असे देखील निरीक्षण नोंदवलं की, संपूर्ण स्टेशन डायरी या घडीला कोर्टात आणणे शक्य नाही. जर गरज लागली तर त्यातील संबंधित एन्ट्री योग्य वेळी मागवून घेता येतील.