Rohit Pawar Allegation pudhari
मुंबई

Rohit Pawar Allegation: पक्षाच्या नियंत्रणासाठी काळी जादू... सुनेत्रा काकी राजकारण लय वंगाळ.. रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

Rohit Pawar On NCP Control: जय पवारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; ती पत्रकार परिषद का होत नाहीये... रोहित पवार यांचा सवाल

Anirudha Sankpal

Rohit Pawar NCP Control Allegation: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आली होती का... अजित पवार यांच्या निधनानंतर १८ व्या दिवशी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाची घटना बदलण्याचा प्रयत्न झाला असे आरोप केले. तसेच त्यांनी जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते मात्र त्यांना रोखण्यात आलं असा देखील आरोप केला.

ते १६ फेब्रुवारीचं पत्र..

अजित पवार यांच्या अपघातावर रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी, अजित पवारांना जाऊन फक्त १८ दिवस झाले होते. १६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा काकींना न सांगता इलेक्शन कमिशनला सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्र लिहिलं. यासाठी आमदारांनाही विश्वासात घेतलं नाही. या पत्राच्या माध्यमातून जे अधिकार अजित पवार यांना होते ते सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आले. बहुदा हे सुनेत्रा काकींना काळालं असावं म्हणूच त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या झाल्या तिथं पत्रव्यवहार केला.

पक्षावर ताबा मिळवण्यासाठी काळी जादू

रोहित पवार यांनी अजित पवार गटाचा पक्षावर ताबा मिळवण्यासाठी काळी जादू झाली का असा संशय देखील व्यक्त केला. ते म्हणाले, 'अजित दादा हयात असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जाते. कदाचित नाशिकचाच भोंदू बाबाच्या माध्यमातून काळी जादू करण्याचा प्रयत्न झाला. पक्षावर नियंत्रण मिळावण्यासाठी असं काही केलं का?

अजित दादांचे निधन झाल्यानंतर दोन दिवसातच पियूष गोयल यांचे वक्तव्य येतं की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. त्यानंतर ते म्हणाले की मी चुकून बोललो. मात्र घटनाक्रम पाहिला तर सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि काही पक्षांच्या मोठ्या नेत्यांमध्ये काही गोष्टी आधीच ठरल्या होत्या.

फालतू खर्च.. कर्तुत्व नसताना मोठी पदं

रोहित पवार पुढे म्हणाले की, अजित पवार यांचे अंत्यविधी होत असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे तिथे आले ते काय हेतू घेऊन तिथं आले. २७ तारखेच्या बैठकीचा आणि अजित दादांना उशीर होण्याचा देखील विषय होता. या सर्वाचा तपास केला गेला पाहिजे असं आमचं मत आहे. याबाबतचे कागदपत्रे मी सोशल मीडियावरून समोर आणेन.

मात्र यावरून असं सिद्ध होतं की सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. अजित दादा हयात असताना जे फालतू खर्च होते मग नरेश अरोरावरचा खर्च असेल इतर खर्च असतील काही गोष्टी पक्षात चुकीच्या पद्धतीनं होत होत्या. कर्तुत्व नसताना देखील त्यांना मोठी मोठी पदं दिली गेली.

रोहित पुढे म्हणाले, दादा हे कार्यकर्ते आणि आमदारांचे ऐकत होते. मग या लोकांना संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात पाहिजे का असं वाटत होतं का, अजित दादांचा अपघात.. पक्षावर नियंत्रण मिळवणं असं सुरू होतं. मला सुनित्रा काकींना एवढंच सांगायचं आहे की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. अवती भवतीच्या लोकांची काळजी घ्यावी लागेल.

अधिवेशनात दादांच्या निधनावर एक दोन आमदार सोडले तर कोणताही आमदार तिथं बोलला नाही. कारण सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं दादांच्या अपघाताबाबत काहीही बोलायचं नाही. जय पवार देखील पत्रकार परिषद घेणार होते. ती पत्राकर परिषद का नाही झाली. जय लढणारा आहे शेवटी पवार आहे. मराठी माणूस आहे. त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी करतंय का? असा सलाव देखील रोहित पवार यांनी विचारला. त्यांनी आता एफआयआर महाराष्ट्रात वर्ग झाली आहे त्याचे क्रिमिनल इनव्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे असं देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT