Rohit Pawar pudhari photo
मुंबई

Rohit Pawar: कार्लोस नावाचा व्यक्ती कॅकपीटमध्ये जायचा... विम्याचा अँगल, अजित पवारांचं विमान मुद्दामून आदळलं; रोहित यांना शंका

Rohit Pawar Ajit Pawar Plane Crash: प्रकरण आता अपघाताकडून घातपाताकडे.... पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा, रोहित पवारांच्या नव्या प्रेझेंटेशननं खळबळ

Anirudha Sankpal

Rohit Pawar 2nd Press Conference About Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि. १८ फेब्रुवारी) अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आता तपास यंत्रणांवर दबाव वाढत आहे. तसेच आम्ही जे मुद्दे मांडले त्यातील अनेक मुद्द्यांना आता पुष्टी मिळत आहे असं सांगत अजित पवार यांचे विमान मुद्दाम पाडलं अशी शंका बोलून दाखवलं.

यात विम्याचा देखील अँगल आहे. तसंच फ्यूल बाबत देखील रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. याचबरोबर रोहित पवार यांनी व्हीएकआरच्या विमानांच्या कॉकपीटमध्ये कार्लोस नावाचा व्यक्ती जायचा असा देखील दावा केला आहे. हा कार्लोस व्हेनेजुएलाचा आहे. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय लायसन आहे. मात्र तो भारतात कसं काय विमान उडवतोय. तो पॅसेंजर म्हणून येत होता आणि तो नंतर कॉकपीटमध्ये जाऊन विमान उडवायचा. व्हीएसआर कंपनीमध्ये अनेक चुका आहेत. त्या लपवल्या जातात असा दावा देखील रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, 'तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेतच. सामान्यांनी हा अपघात की घातपात विषय लावून धरला होता, ते बोलत होते. आता राजकीय व्यक्ती देखील पत्र लिहीत आहेत. त्यामुळं तपास यंत्रणा जाग्या झाल्या आहेत आता हे प्रकरण अपघाताकडून घातपाताकडं चाललं आहे.

ते नवीन व्हिडिओ दाखवत म्हणाले, 'कालच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तुम्ही विमान अपघातानंतर अधिकचे स्फोट होत आहेत. ते पाहिलं मी पहिल्या पत्रकार परिषदेत जो अधिकच्या फ्युअल कॅनचा विषय मांडला होता ते सिद्ध करणारे हे व्हिडिओ आहेत. विमानात अधिकचे फ्युअल टँक होते ही आमची शंका बळावत आहेत.

मी ब्लॅक बॉक्स संदर्भात एक शंका व्यक्त केली होती. त्यावेळी मी उद्या जाऊन हे कदाचित व्हॉईस रेकॉर्डिंग नाही. हे नाही ते नाही अशी काही कारणं पुढे येऊ शकतात. ती जर आली तर नक्कीच आपल्याला घातपात अँगलकडे बघता येईल असं मी म्हणालो होतो.

ब्लॅक बॉक्सबाबत शंका खरी?

दुर्दैवानं या बाबतचं एक स्पष्टीकरण केंद्र सरकारची एजन्सी AAIB कडून आलं आहे की कदाचित ब्लॅक बॉक्समध्ये अडचण असू शकते. त्याचा काही भाग जळला असं ते म्हणतात. फ्युअल टँक हे विमानाचे टॉयलेट जिथं असतं तिथं ते ठेवले जातात. त्याच्या मागच्याच बाजूला ब्लॅक बॉक्स असतो. आपणाला असं म्हणता येईल की आधी विमानातील कॅन पेटले त्यानंतर विमानातील पंख्यातील पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल.

या विमानात फ्युअल टँक पूर्ण भरला होता. तुम्हाला जर फक्त बारामतीत जायचं होतं तर फ्युअल टँक पूर्ण का भरला. एवढं फ्युअल घेऊन बारामतीला जाण्याचं कारण काय?

पायलटचा वापर झाला

पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा असं मी म्हणालो होतो. जर विमानात फ्युअल जास्त असेल तर स्फोट मोठा होईल अशी शंका आमच्या मनात आहे. ही शंका कुठंतरी खरी ठरताना आपल्याला दिसत आहे.

त्यांनी आपला अधिकृत फ्लाईट प्लॅन डीजीसीएला सांगितला नव्हता. पुणे हे दुसरं एअरपोर्ट देता येत नाही कारण सकाळी तिथं डिफेन्सचं फ्लाईंग होत. सोलापूर देता येत नाही. तिथंही अडचणी आहेत. ते फक्त मुंबई एअरपोर्ट देऊ शकतात. ५००० मीटर दृष्यमानतेचा डीजीसीएचा नियम आहे. असं असताना तुम्ही उगाच फेर फटका मारत बसण्यापेक्षा परत जायला हवं होतं.

गोपी नावाचा vsr चा हँडलर आहे तो फार करामती आहे. आता या कंपनीचं कागदपत्रे तयार करण्याचं सुरू आहे. त्यामुळं तपास यंत्रणांनी सीसीटीव्ही फुटेज आणि ईमेल यांची देखील चौकशी करावी दिल्लीतील मुख्यालयातून या गोपीकडं फ्लाईट प्लॅन आला असावा. त्यानं तो इथं प्रिंट केला असावा.

हे कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे. त्यामुळं कृपा करून फक्त कागदाला कागद जोडू नका त्याची सखोल चौकशी करा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली. आम्हाला डिजीटल प्रुफ पाहिजे.

ब्लॅक बॉक्स जळतो का?

ब्लॅक बॉक्स जळतो का याबाबत जाणकारांनी सांगितलं की ११०० डिग्रीमध्ये एक तास ठेवला तर त्याचं नुकसान होऊ शकतं. ब्लॅक बॉक्समध्ये cvr म्हणजे व्हाईस रेकॉर्डर असतं. आणि FDR असतं त्यांला फ्लाईट डेटा रेकॉर्ड असतं.

आम्ही जे म्हणतोय की त्यानं काही गोष्टी बंद केल्या. हाईट आणि स्पीड याचा सगळा डेटा असतो. विमानातील कागज देखील जळाला नाही. आगीचा भपका हा १००० डिग्रीच्या आसपास असू शकतो असं आमचं मत आहे. हे जे सांगत आहेत की ते जळलं असेल ते जळलं असेल तर आमचं असं म्हणणं आहे की ते मॅन्युपुलेशन आहे असं आमचं ठाम मत आहे.

ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागच्या बाजूला असतो. अजितदादांच्या विमानाचा तो मागचा भाग जळालेला नाही. तांब्याच्या वायर असतात त्या जळालेल्या नाहीत. तांब्याचा मेेल्टिंग पॉईंट तुलनेनं कमी असतो तरी त्या जळालेल्या नाहीत. त्यामुळं AAIB चे कालचे जे स्टेटमेंट होतं ते आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं असं आमचं म्हणणं आहे.

विम्याचा अँगल

अजित पवार यांच्या विमान उपघातात विम्याचा देखील एक अँगल आहे. ज्यावेळी ते विमान घेतलं होत ते ३५ कोटींना घेतलं होतं. मात्र आता त्याच्या इंजिनची गुणवत्ता पाहिली तर ते जास्तीजास्त १० ते १५ कोटी रूपयाला विकलं गेलं असतं. कंपनीतील जुन्या लोकांनी हे जरी १० कोटीत दिलं असतं तरी ते न घेणंच योग्य ठरलं असतं असं सांगितलं.

मात्र त्या विमानाची आजची विम्याची किंमत ही ५५ कोटी रूपये होती. लायबिलिटी इन्शुरन्स हा २१० कोटी रूपये होता. याच विमानत बसलेले पाचही जण आले. पायलटला किती वीमा मिळणार होता हे त्याला देखील माहिती होतं की नाही मला माहिती नाही.

मात्र कंपनीतील ज्या व्यक्तींची म्हणजे अकाऊंटेबल मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर यांची चौकशी झाली आहे का अकाऊंटेबल मॅनेजर कोण आहे याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT