Raj Thackeray On NCP (SP)  pudhari
मुंबई

Raj Thackeray On NCP (SP) : हे पवारांचं जंतरमंतर आहे; 2023 मधील पोस्ट शेअर करत राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray On Delimitation :राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, '२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो.

Anirudha Sankpal

Raj Thackeray On NCP (SP) : केंद्र सरकारने परिसीमन विधेयकासाठी शरद पवार गटाने आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केल्यानंतर आता राज्यतूनच नाही तर देशातून त्यांच्यावर टीका होत आहे. शरद पवार आणि डीएमके यांनी पाठिंबा दिल्यामुळे लोकसभेत परिसीमन विधेयक मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीची टीका

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीचे घटकपक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांनी टीकेची झोड उठवली आहे. आता त्यांना मनसे प्रमुख राज ठाकरेंची देखील साथ मिळाली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत २ जुलै २०२३ मध्ये दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली.

राज ठाकरे यांची खोचक पोस्ट

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, '२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो.'

राज ठाकरे यांनी आपल्या या पोस्टद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे आतून एकच होते. ते दोघांमध्ये फूट पडल्याचं नाटक करत होते अशी टीका केली.

पाठीत खंजीर खुपसला

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असे सुतोवाच आज जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर टीका केली. शरद पवार खासदार व्हावेत म्हणून आम्ही त्याग केला. आज त्याच शरद पवारांनी सरकारच्या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पाठीत खंजीर खुसला अशी भावना त्यांनी बोलून दाखवलं.

त्याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ज्यांनी मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाला पाठिंबा दिला आहे ते २१ व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार असल्याचं म्हटलं. ज्यांनी पायाखालची जमीन वाचवण्यासाठी देश खड्ड्यात ढकलला त्यांना काळ आणि जनता माफ करणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT