मुंबई

Maratha reservation protest : जालन्यातील लाठीमार घटनेचे मुंबईत तीव्र पडसाद; सरकारविरोधी घोषणाबाजी

अविनाश सुतार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद रविवारी (दि.३) मुंबई येथे उमटले. दादर (पश्चिम) येथील प्लाझा सिनेमा समोर मराठ्यांनी एकत्रित आंदोलन सुरू केले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. (Maratha reservation protest)

जोपर्यंत फडणवीस राजीनामा देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

मराठा आरक्षण प्रश्नी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी लाठीमार केला. याचे पडसाद राज्यभर उमटले. जालना येथे रक्त सांडलेल्या प्रत्येक भगिनींच्या अश्रुची किंमत या सरकारला मोजावी लागेल. हीच ती वेळ झेंड्याचा दांडा हातात घेऊन या सरकारला जाब विचारण्याची आहे. (Maratha reservation protest)

या आंदोलनात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. याचबरोबर आंदोलकांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी 'एक मराठा लाख मराठा', 'उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', अशा घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT