मुंबई

महिला पोलीसाची छेडछाड, विक्रोळीतील पार्क साईट पोलीस ठाण्याला घेराव

अविनाश सुतार

विक्रोळी, पुढारी वृत्तसेवा: ईदच्या जुलूसमध्ये आलेल्या तरुणाने एक तरुणीचा विनयभंग केल्यावर शुक्रवार (दि. २९) रात्री विक्रोळी पार्कसाइटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीला अटक दुसऱ्या दिवसापर्यंत न केल्याने हिंदुत्तववादी संघटना, राजकीय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पार्क साईट पोलीस ठाण्याला घेराव घालत आज (दि. ३०) ठिय्या आंदोलन केले.

पीडित महिला ही पोलीस कर्मचारी आहे. सुट्टीवर असल्याने त्या विक्रोळी येथील सूर्यनगरमध्ये आपल्या नातेवाईकाकडे आल्या होत्या. यावेळी ज्युलूस मधील एक तरुणाने तिचा पाठलाग करुन तिची छेड काढल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच खासदार मनोज कोटक, आमदार सुनील राऊत पार्क साईट पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांची भेट घेऊन आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

या प्रकरणी विनयभंगचा गुन्हा दाखल असून आरोपीच्या शोधात सहा पथके तयार करुन शोध घेतला जात आहे. नागरिकांनी शांतता बाळगावी, अशी विनंती पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी केली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT