मुंबई : मानखुर्दमध्ये ३० लाखांचे अंमली पदार्थ जप्त! ट्रॉम्बे पोलिसांच्या कारवाईत दोघांना अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ट्रॉम्बे पोलिसांनी मानखुर्द महाराष्ट्र नगर मधून ६ किलो ४४ ग्राम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. याची किंमत ३० लाख २२ हजार असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
मानखुर्द महाराष्ट्र नगर मधील पत्राचाळ इमारत क्र. ८ च्या पाठीमागील रस्त्यावर दोन व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक शरद नाणेकर, पो. उप. निरीक्षक माळवदकर, आव्हाड, धुमाळ, प्रदीप देशमुख, कासार व त्यांच्या पथकाने सापळा रचून नदीम मोहम्मद इंद्रिस शहा (३०) व अक्षय वाघमारे (२६) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० लाख २२ हजार किंमतीचे ६ किलो ४४ ग्राम वजनाचे चरस नावाचा अंमली पदार्थ जप्त केला. दोघेही आरोपी उरण येथे राहणारे आहेत.