Prakash Ambedkar Jantar Mantar pudhari
मुंबई

Prakash Ambedkar Jantar Mantar: असंच सुरू राहिलं तर गृहयुद्ध... प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य, राहुल गांधीनाही दिला सल्ला

वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Anirudha Sankpal

Prakash Ambedkar Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोज जनता पार्टी आपलं जंतर मंतर २.० आंदोनल आजपासून सुरू करत आहे. आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. कॉकरोज जनता पार्टीचा संस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक अभिजीत दिपके आणि त्यांच्या आशुतोष, सौरव या साथीदारांना देखील दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं.

यानंतर वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी हे सरकार हुकूमशाही पद्धतीचं सरकार आहे. आंदोलन होऊच नये या दृष्टीकोणातून सर्व हालचाली सुरू असल्याचं देखील ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना देखील एक सल्ला दिला आहे.

आंदोलनावरील निर्बंध आणि पोलिसांची भूमिका

प्रकाश आंबेडकर सरकारच्या आंदोलन दडपण्याच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले, आंदोलनच होऊ नये याच दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेला आहे." सरकारने ट्रेन बंद केल्या असल्या तरी लोक पाच-पाच, सहा-सहा किलोमीटर चालत आंदोलनासाठी येत आहेत.

आंदोलनच होऊन द्यायचं नाही, लोकांपुढे त्यांचं कर्तृत्व येऊ नये आणि त्याची चर्चा होऊ नये," अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. असं देखील प्रकाश अंबेडकर म्हणाले.

त्यांनी पोलिसांनी यंगर जनरेशनला (तरुण पिढीला) चॅलेंज देण्याच्या भानगडीत पडू नये. पोलिसांनी नोटीसा दिल्या असल्या तरी हजारो लोक हुतात्मा स्मारकात जमून पाठिंबा जाहीर करतील. जमावबंदीचा कायदा आणीबाणीमध्ये (इमर्जन्सी) वापरला पाहिजे, परंतु पोलीस तो रोजच्यासारखा आयत्या वेळी वापरत आहेत असे वक्तव्य देखील केलं.

सरकार आणि हुकूमशाहीवर टीका

आंबेडकर यांनी हे जे सरकार आहे हे हिटलरशाहीचं सरकार आहे. आम्ही चुकतो किंवा कोणाशी चर्चा केली पाहिजे अशी यांची वृत्ती नाही. सरकारने जो चुकला आहे त्याला चुकलं हे म्हणायला शिकलं पाहिजे, तरच इथली लोकशाही टिकेल; नाहीतर असा हुकूमशाहीचा मार्ग राहिला तर इथे सिव्हिल वॉर (गृहयुद्ध) होताना मला दिसत आहे. असे म्हणत एकप्रकारे सरकारला परिस्थितीची जाणीवच करून दिली.

आंदोलकांना सल्ला

प्रकाश आंबेडकर यांनी अभिजीत यांच्या आंदोलनाबाबत बोलताना एक सल्ला देखील दिला. त्यांनी, "त्यांना (आंदोलक) कदाचित अटक होईल, एफआयआर दाखल होईल किंवा जेलमध्ये डांबले जाईल; पण त्यांनी आता हटता कामा नये. लढा हातात घेतला तर पूर्णपणे केला पाहिजे".

लोकांचा सरकारच्या विरोधात प्रक्षोभ आहेच. सध्या मुख्य मुद्दा मुख्य निवडणूक आयुक्तांचा (Chief Election Commissioner) आहे, परंतु सरकार त्यावर बोलायलाच तयार नाही. असे देखील ते म्हणाले.

राहुल गांधींनाही सल्ला

अमिताभ बच्चन यांच्या विधानाचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "जसे अमिताभ बच्चन म्हणाले होते की 'वन मॅन शो' संपलेला आहे आणि एक नट पूर्ण सिनेमा कॅरी करू शकत नाही; राजकारणातही तीच परिस्थिती आली आहे. राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष हाच एक पक्ष आहे हे जे त्यांच्या डोक्यात बसलेले आहे ते काढून टाकावे. काँग्रेसला इतर जण मदत करायला तयार आहेत, तेव्हा त्यांनी ती मदत स्वीकारली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT