मुंबई

Loksabha Election : मुंबईत उन्हाच्या त्रासामुळे पोलिंग एजंटचा मृत्यू

करण शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक झाली. यामध्ये देशातील ४९ मतदारसंघांचा समावेश होता. तर यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांचा समावेश होता. ज्यातील अधिकतर मुंबई शहर आणि उपनगरातील मतदारसंघांचा समावेश होता.

मतदान सुरू असताना मुंबईतील एका केंद्रावर पोलिंग एजंटचे उन्हाचा त्रासामुळे निधन झाले. वरळी मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटातील एका कार्यकर्त्याचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला. मनोहर नलगे असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्यांचे वय ६२ होते. डिलाय रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० येथील म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पुलिंग बुध होता. उन्हामुळे नलगे यांना त्रास झाला आणि त्याचे निधन झाले. नलगे यांना त्रास होऊ लागल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT