PlastiWorld 2026 India Pudhari
मुंबई

PlastiWorld 2026 India: ‘प्लास्टिवर्ल्ड 2026’ला मुंबईत शानदार प्रारंभ; प्लास्टिक निर्यात वाढीला मोठी चालना

भारताचे 50 अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य; जागतिक बाजारपेठेत मजबूत स्थान मिळवण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्लास्टिक अंतिम उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आयोजित केलेले पहिलेच ‌‘प्लास्टिवर्ल्ड 2026‌’, या ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (अखझचअ) तर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सोमवारी झाले.

यावेळी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र लघू उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे,उपस्थित होते. समारंभाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर रामू एस. देओरा, रविकांत कपूर, अरविंद गोयंका, सुनील शाह, अरविंद मेहता, प्लास्टिवर्ल्डचे अध्यक्ष कैलाश मुरारका, प्लास्ट इंडियाचे अध्यक्ष रवीश कामत, आणि अजय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

प्लास्टिवर्ल्डसारख्या व्यासपीठांमुळे भारताची जागतिक व्यापार व उत्पादन क्षेत्रातील ताकद अधिक बळकट होत असल्याचे पानसरे यांनी नमूद केले. पुढील तीन वर्षांत प्लास्टिक निर्यात 12.5 अब्जवरून 50 अब्जपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे अरविंद मेहता यांनी सांगितले.

जागतिक प्लास्टिक निर्यात बाजार सुमारे 825 अब्ज असून 6% दराने वाढत आहे, तर भारताची निर्यात सध्या 12.5 अब्ज असून 4.5% दराने वाढत आहे. यूके, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि युरोपियन युनियनसारख्या देशांसोबतच्या मुक्त व्यापार करारांमुळे प्लास्टिक उत्पादनांसाठी 98-99% टॅरिफ लाईन्स खुल्या होणार असल्याचे अरविंद गोयंका यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT