Salary allowances tax benefits | कर वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे भत्ते

Salary allowances tax benefits |
Salary allowances tax benefits | कर वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे भत्ते
Published on
Updated on

आशिष जोशी

इनकम टॅक्स वाचवण्यासाठी पगारातील काही खास भत्ते खूप मदत करतात. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कंपनीच्या कठ शी बोलून तुमच्या पगारामध्ये हे बदल करून घेऊ शकता.

प्रवास किंवा कन्व्हेयन्स अलाउन्स

घरून ऑफिसला येण्या-जाण्याचा खर्च भागवण्यासाठी हा भत्ता दिला जातो. अनेक कंपन्या हा भत्ता पगारात समाविष्ट करतात, ज्यामुळे टॅक्स वाचतो.

फूड कूपन किंवा एंटरटेन्मेंट अलाउन्स

जेवणाचे कूपन किंवा मील व्हाऊचर (उदा. सोडेक्सो) द्वारे टॅक्स वाचवता येतो. अनेक कंपन्या दरमहा ठराविक रक्कम यासाठी देतात. खाण्याचे बिल दाखवल्यास ही रक्कम टॅक्स फ्री मिळते.

कार मेंटेनन्स अलाउन्स

काही कंपन्या कर्मचार्‍यांना कारच्या देखभालीसाठी भत्ता देतात. यामध्ये पेट्रोल-डिझेल, सर्व्हिसिंग आणि ड्रायव्हरचा पगार यांचा समावेश असू शकतो. या खर्चावर टॅक्स भरावा लागत नाही.

मोबाईल आणि इंटरनेट अलाउन्स

ऑफिसच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या मोबाईल आणि इंटरनेटच्या बिलाचा परतावा (ReimbuA°sement) अनेक कंपन्या देतात. बिल सादर केल्यास ही रक्कम टॅक्स फ्री मिळते.

युनिफॉर्म अलाउन्स

ज्या ठिकाणी युनिफॉर्म सक्तीचा असतो, तिथे तो खरेदी करण्यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी कंपन्या भत्ता देतात. या रकमेवर टॅक्स लागत नाही.

मेडिकल अलाउन्स

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांसाठी हा भत्ता दिला जातो. वैद्यकीय बिले सादर करून यावर टॅक्स सवलत मिळवता येते.

वर्तमानपत्र, मॅगझिन आणि बुक्स अलाउन्स

कामाशी संबंधित वाचनासाठी (उदा. न्यूजपेपर किंवा पुस्तके) मिळणारा भत्ता पूर्णपणे टॅक्स फ्री असू शकतो. यासाठी तुम्हाला केवळ बिले जमा करावी लागतात.

महत्त्वाची टीप :

हे सर्व फायदे मिळवण्यासाठी तुमच्याकडे मूळ बिले असणे आवश्यक आहे. तसेच, हे फायदे प्रामुख्याने जुन्या टॅक्स पद्धतीत अधिक लाभदायक ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news