Pharmacy Pudhari
मुंबई

Pharmacy Diploma: औषधनिर्माणशास्त्र पदविका पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना अंतिम संधी

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमातील ‘एस’ अभ्यासक्रमाच्या प्रलंबित विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पात्र विद्यार्थ्यांना हिवाळी २०२६ आणि उन्हाळी २०२७ परीक्षांद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमातील प्रलंबित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने दिलासा दिला आहे. पूर्वीच्या ‘एस’ अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आणि अद्याप पदविका पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षा २०२६ आणि उन्हाळी परीक्षा २०२७ या परीक्षांमध्ये सहभागी होता येणार आहे.

तंत्र शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक नियमावलीनुसार, औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमातील ‘एस’ अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम पूर्ण केले आहे, अशा विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, या अंतिम संधीमध्येही संबंधित विद्यार्थी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाहीत, तर त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे प्रलंबित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हिवाळी परीक्षा २०२६ साठी परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक मंडळाने ९ सप्टेंबर रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार, नियमित परीक्षा शुल्कासह विद्यार्थ्यांना १७ ते २० सप्टेंबरदरम्यान परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

नियमित शुल्कासह भरलेले अर्ज संस्थास्तरावर निश्चित करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर आहे. नियमित परीक्षा शुल्क अधिक २०० रुपये दंडासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २१ ते २२ सप्टेंबर आहे. अशा अर्जांचे संस्थास्तरावर निश्चितीकरण २२ सप्टेंबरपर्यंत करावे लागणार आहे. विभागीय कार्यालय स्तरावर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज निश्चित करण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT