Sunil Tatkare News Pudhari
मुंबई

NCP Internal Politics: राष्ट्रवादीत दुफळी नाही; तटकरेंनी मतभेदाच्या चर्चा फेटाळल्या

पक्षातील अंतर्गत खदखद व नाराजीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अजित पवार राष्ट्रवादीतील अंतर्गत खदखद आणि संघटनात्मक प्रश्नांवर पार्थ पवार यांच्या वरळीतील ‘शुभदा निवास’स्थानी शनिवारी पक्षाची बैठक पार पडली. पक्षातील अंतर्गत खदखद व नाराजीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड अवैध आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिणारे पक्षाचे नेते सच्चिदानंद सिंह यांच्यावर पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचा सूर या बैठकीत घुमला.

विदर्भासह राज्यात इतर ठिकाणी पक्ष विस्ताराच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याशिवाय संपूर्ण राज्याचाही आढावा घेण्यात आला. पक्षातील दुफळीच्या चर्चां फेटाळून लावताना तटकरे म्हणाले, प्रसार माध्यमाच्या कल्पनेत दुफळी असेल तर काय बोलणार. आमच्यात कधी दुफळी नव्हती.

बैठकीला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर उपस्थित नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेवर तटकरे यांनी महेंद्र दळवी काही बोलले म्हणून मी बोललेच पाहिजे, असे नाही. मला माझा दर्जा आणि स्थान माहिती असल्याचे तटकरे म्हणाले.

पार्थ-शरद पवार भेटीवरही प्रश्न

दरम्यान, शरद पवार यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली, अशी विचारणा नेत्यांनी पार्थ पवार यांच्याकडे केली. त्यावर पार्थ यांनी, काही खास चर्चा झाली नाही. वैयक्तिक विषयांवर चर्चा झाली, असे सांगितल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT