Land Scam Pudhari
मुंबई

Panvel land scam: पनवेलमध्ये स्वस्त प्लॉटचे आमिषाने फसवणूक; ‌‘फार्म एन लँड‌’ संचालकाविरोधात गुन्हा

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाला ‌‘फार्म एन लँड‌’ कंपनीमार्फत जमीन विक्रीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: पनवेल परिसरात कमी दरात जमीन व प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा गुंतवणूकदारांची तब्बल 30 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी ‌‘फार्म एन लँड‌’ कंपनीचा संचालक रवींद्र रोहिदास नायक याच्याविरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, याच आरोपीविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अलीकडेच अटक करण्यात आली होती. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाला ‌‘फार्म एन लँड‌’ कंपनीमार्फत जमीन विक्रीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार सानपाडा येथील सेक्टर 30 ए मधील जी स्क्वेअर बिझनेस पार्कमधील कंपनीच्या कार्यालयाची आणि संबंधित व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान काही गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये स्वीकारूनही जमीन त्यांच्या नावावर करण्यात आलेली नसल्याचे उघड झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र नायक याने सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पनवेल परिसरात कमी दरात प्लॉट उपलब्ध असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. प्रति गुंठा अडीच लाख ते साडेतीन लाख रुपयांत जमीन मिळणार असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले. त्यानंतर संबंधितांना साई-पनवेल परिसरातील जागांची पाहणी करून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT