Political News: माजी सभापती महादेव पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम? राष्ट्रवादीचा बडा मासा शिवसेनेच्या गळाला?

तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Political News
Political NewsPudhari
Published on
Updated on

म्हसळा शहर: म्हसळा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेले महादेव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांना चार ओळींचे पत्र पाठवून आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Political News
Uran Monsoon Preparation: उरण नगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग; 50 टक्के कामे पूर्ण

जि. प., प.स. या सार्वत्रिक निवडणुकांनंतर महादेव पाटील हे खासदार सुनील तटकरे तसेच मंत्री आदिती तटकरे यांच्या विविध कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याचे दिसून येत होते. खारगाव खुर्द सकलप परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असतानाही त्या भागात पक्षाला अपेक्षित मतदान मिळाले नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Political News
CIDCO land acquisition case: जासईतील भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाचा खो

पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अपेक्षित स्थान मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे त्यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या संपर्कात राहून मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news