Paneer Labeling Rule Pudhari
मुंबई

Paneer Labeling Rule: पनीर कशाचे खाताय? ‘दुधापासूनचे पनीर‌’ असा स्पष्ट उल्लेख मेनूवर करण्याचे फर्मान

एफएसएसएआयचे कडक आदेश; हॉटेल्सना मेनू आणि बिलावर ‘मिल्क पनीर’ किंवा ‘अ‍ॅनालॉग पनीर’ नमूद करणे बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई:‌ ‘चीज‌’ आणि पनीरच्या नावाखाली नॉन-डेअरी व भेसळयुक्त उत्पादने विक्रीला आणण्यावर अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) कडक भूमिका घेतली आहे. दुधाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकांपासून तयार केलेल्या पदार्थांना ‌‘चीज‌’, पनीर म्हणून विक्री करणे नियमबाह्य ठरवण्यात आले आहे.

हॉटेलातील मेनू कार्डमध्ये मोठा बदल करण्याचे फर्मान अन्न व औषध प्रशासनाने सोडले असून, मेनू कार्डवर केवळ पनीरचा उल्लेख करून यापुढे चालणार नाही.‌‘दुधापासून तयार केलेले पनीर‌’ असा स्पष्ट व लांबलचक उल्लेख मेनू कार्डवर करावा लागेल. एखादा हॉटेलचालक ॲनालॉग पनीर विकत असेल तर तसा स्पष्ट उल्लेख मेनू कर्डवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोणतेही पनीर दुधापासूनचे पनीर म्हणून खपवण्याचे उद्योग यामुळे थांबतील. पनीर फक्त दुधापासून आणि ॲनालॉग घटकांपासून तयार होते. यातील दुसऱ्या प्रकारात ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याने रेस्टॉरंट्स, हॉटेल्सना केवळ मेनू कार्डवरच नव्हे तर बिलावरही दुधापासूनचे पनीर किंवा पनीर ॲनालॉग असे नमूद करावे लागेल. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही राज्य सरकारने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT