मुंबई

पालघर : दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या १२ जणांच्या मुसक्या आवळल्या

Shambhuraj Pachindre

पालघर; पुढारी वृत्तसेवा : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या १२ जणांना पालघरच्या पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (दि.१७) रात्री सव्वा तीनच्या दरम्यान पालघर नवली फाटक दरम्यान एका बँकेच्या एटीएम नजीक घडली.

यावेळी त्यांच्याकडे टेम्पो, लोखंडी कटर, लोखंडी धारदार कोयता, नॉयलॉन दोरी, लोखंडी कटावणी, दोन हॅन्डलचे खिळे काढण्याचे लोखंडी कटर, वायर कापण्याचे लोखंडी कटर तसेच मिरची पूड असे साहित्य या संशयित १२ व्यक्तींकडे सापडले. यामुळे ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपी विरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पालघर रेल्वे स्टेशन ते नवली फाटक परिसरात पेट्रोलींग करीत असतांना पहाटे ३.१५ च्या सुमारास पालघर पूर्व येथील नवली फाटकाजवळील एटीएमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अंधाराच्या ठिकाणी काही इसम दोन मोटार टेम्पोसह संशयितरीत्या हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे पोहवा गोरे यांनी लागलीच रात्रगस्त अधिकारी पगडे यांना माहिती देऊन लागलीच येण्याची विनंती केली. पगडे यांनी पालघर पोलीस ठाणेतील इतर पोलीस स्टाफला सोबत घेवून सदर घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी आपल्याकडे असलेल्या बॅटरीच्या साह्याने लपून बसलेल्या संशयित इसमाचा कसोसीने शोध घेतला. दरम्यान सदर संशयित पोलिसांच्या हालचालींवर लक्ष देऊन व अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्याच्या तयारी होते.

पोलिसांनी शिताफीने तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने एकूण १२ इसमांचा शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करून अंगझडती केली असता त्यांच्याकडून हत्यारे ताब्यात घेतली. या हत्यारांचा संच पाहता या १२ जणांच्या टोळीकडून मोठा दरोडा पडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, सपोनि मंजुषा शिरसाट, पोउपनि बालाजी मुंढे, पोउपनि संकेत पगडे, पोउपनि दौलत आतंकारी, सुभाष खंडागळे, रविंद्र गोरे, पवार, आव्हाड, सुरूम, मुसळे, खराड, लहांगे, डुबल करीत आहेत.

अधिक माहितीनुसार आत्तापर्यंत पायधुणी, केळवा, खडवली, ठाणे ग्रामीण या ठिकाणी दरोडे घातल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये अंधेरीचा सलमान आणि रबाळे येथील शोएब हे दोघे नवी मुंबई येथून ही गॅंग ऑपरेट करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या 12 जणांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या काही आरोपींची नावे समजू शकली नाहीत. या बारा जणांमधील वसई 2, नालासोपारा 3, वडाळा 2, शहा पूर 1, उल्हासनगर 1 या भागातील आहेत.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT