Pahalgam Terror Attack
मुंबई : पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांवर काश्मीरमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून या पर्यटकांची विचारपूस केली. तसेच त्यांनी उपचार करणाऱ्या लष्करी सेवेतील डॉक्टरांचेही आभार मानले.

फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या दूरध्वनीवरून व्हिडिओ कॅालवर डाक्टर्स आणि रूग्णांशी संवाद साधला. महाजन हे श्रीनगरमध्ये बुधवारी दाखल झाले. यानंतर त्यांनी विविध हाटेल्समध्ये थांबलेल्या पर्यटकांची विचारपूस केली. तसेच त्यांनी लष्करी रुग्णालयात महाराष्ट्रातील उपचार घेत असलेल्या पर्यटकांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांशी बोलताना उपचार घेत असलेल्या पर्यटकांना गहिवरून आले होते. “ देवाच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने आम्ही वाचलो,” अशी अशा भावना एका नागरिकाने व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील जनता तुमच्या पाठीशी उभी आहे, असे त्यांनी पर्यटकांना सांगितले. पर्यटकांवर शस्त्रक्रिया आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही महाजन यांनी त्यांचे बोलणे करून दिले. “तुमचे काम अतिशय खडतर आणि कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी डॉक्टरांचे आभार मानले.