Operation Sindoor
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात अस्वस्थता होती. भ्याड हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेले होते. हल्ल्यानंतर बघ्याची भूमिका घेणं अशक्य होते. भारतीय सैन्यदलावर सर्वांचा पूर्ण विश्वास होता. भारतीय सैन्य दलाने पाकव्याफ्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. सरकारच्या प्रत्येक निर्णयांच्या आम्ही पाठिशी आहोत, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, "पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात अस्वस्थता होती. ओमर अब्दुला यांनी पाकिस्तानविरोधात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. दहशतवाद्यांविरोधी काश्मीरी जनतेनंही तीव्र भूमिका घेतली आहे. सर्वपक्षीय बैठक झाली. सरकारच्या प्रत्येक निर्णयांच्या आम्ही पाठिशी आहोत. भारतीय सैन्यदलाने पाक व्याप्त काश्मीरमबधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. येथील दहशतवाद्यांना पाकिस्तान आर्थिक रसद पुरवते."
शरद पवार यांनी "ऑपरेशन सिंदूर" द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिल्याबद्दल भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरील पोस्टमध्ये शदर पवार म्हणाले की, मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास भारताने नऊ ठिकाणी यशस्वी हवाई हल्ले केले आणि प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्याला योग्य उत्तर देऊन देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण केल्याबद्दल आणि आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवल्याबद्दल भारतीय सैनिकांचे अभिनंदन."
सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सशस्त्र दलांना किंवा त्यांच्या नागरिकांना कोणतेही नुकसान न होता अचूक हल्ले केले. पवार म्हणाले, "देशाला आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे." 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.