NCP Naresh Arora Ties pudhari
मुंबई

NCP Naresh Arora Ties: राष्ट्रवादीने अखेर नरेश अरोरांशी तोडले संबंध... निवडणूक जिंकण्यात केली होती मदत

Anirudha Sankpal

NCP Naresh Arora Ties: राष्ट्रवादी काँग्रेसने वादग्रस्त रणनितीकार नरेश अरोरांशी अखेर संबंध तोडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डिझाईन बॉक्स या डिजीटल मीडिया कंपनिची सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार होते.

२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम पाहिले होते. राष्ट्रवादीच्या विजयात देखील त्यांचा वाटा असल्याचं बोललं जातं. लाडक्या बहिणीच्या यशानंतर अजित पवार यांना गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्याचा सल्ला देखील नरेश अरोरा यांनीच दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर नरेश अरोरा यांच्या पक्षातील भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच त्यांच्यासोबतच्या आर्थिक व्यवहारांबाबत देखील आक्षेप घेण्यात आला होता. अखेर त्यांची सेवा थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

दरम्यान, काही महिन्यापूर्वीच नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर छापेमारी झाली होती. ही कारवाई पुणे पोलीस आणि क्राईम ब्रांचने केली होती. यावेळी देखील अजित पवार यांनी ही छापेमारी नाही तर पोलीस फक्त माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते असं सांगत सारवासारव केली होती. यावेळी तपास अधिकाऱ्यांना कंपनीकडून पूर्ण सहकार्य करण्यात आलं आणि त्यांनी कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट मिळाली नसल्याचं देखील सांगितलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT