Pratap Sarnaik Pudhari
मुंबई

NCMC Card: एसटीचे एनसीएमसी कार्ड आता थेट ज्येष्ठांच्या हातात; प्रताप सरनाईक यांचे आदेश

हे कार्ड मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जिल्ह्यातील आगारात जावे लागत होते. जिल्हा आगार गाठण्यासाठी त्यांना किमान 60 ते 80 किलोमीटर प्रवास करावा लागत होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डची नोंदणी आता राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या आदेशामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एसटीतून प्रवास करणाऱ्या 75 वर्षांपर्यंत सर्व महिला व पुरुषांना 65 ते 75 वर्षेपर्यंत 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जाते, तर 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना एसटीतून मोफत प्रवास आहे. आधार कार्डच्या पुराव्यावरही सवलत दिली जाते.

मात्र, एसटीने आता हा पुरावा ग्राह्य धरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याऐवजी एनसीएमसी कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु, हे कार्ड मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जिल्ह्यातील आगारात जावे लागत होते. जिल्हा आगार गाठण्यासाठी त्यांना किमान 60 ते 80 किलोमीटर प्रवास करावा लागत होता.

ज्येष्ठांची गैरसोय, प्रवासाची दगदग व सुरक्षितता लक्षात घेऊन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांची भेट घेतली व ज्येष्ठांची व्यथा सांगितली.

त्यावर सरनाईक यांनी राज्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात एनसीएमसी कार्ड नोंदणी करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले. त्यानुसार कंपनी त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून महिनाभरात कार्ड नागरिकांच्या हातात देणार आहे.

फेसकामने यासाठी जिल्हा वार समन्वयक प्रतिनिधी नेमण्याची तयारी सुरू केली आहे. या सेवेचा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष टेकाळे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT