Crime News Pudhari
मुंबई

Crime News: नवी मुंबईचा उडता पंजाब! ड्रग्ज तस्करीत आतापर्यंत 38 जण अटकेत

5 कोटी 32 लाखांचे अफिम आणि हेरॉईन आतापर्यंत अटक 38 आरोपींकडून जप्त केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे: पंजाबमधून नवी मुंबईत होणाऱ्या ड्रग्ज तस्करीत आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी 38 आरोपींना जेरबंद केले आहे. हे रॅकेट उद्ध्वस्त करीत आणले असतानाच आता पंजाबमधून विदेशी शस्त्र नवी मुंबईत येत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नवी मुंबईचा उडता पंजाब तर झाला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी नाशिक ते पुण्यातील निगडी असा पाठलाग करून ज्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडे आढळून आलेले ऑस्ट्रिया मेड पिस्टल हे पंजाब मार्गे आल्याचे तपासात उघड झाले आहे. तर हा आरोपीही ड्रग्ज तस्करीतही सहभागी आहे.

पंजाबमधून आणलेले अमलीपदार्थ नाशिकमार्गे पुण्यात आणले जात असल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाशिक-पुणे मार्गावर सापळा लावण्यात आला होता. त्यात संशयित गाडीळह पोलिसांनी पाठलाग सुरू केला.

निगडी परिसरात त्यांना अटक करण्यात आली . ही घटना 15 मार्च रोजी घडली. यावेळी आरोपीकडे विदेशी पिस्टल आढळून आले होते. हे पिस्टल कोठून मिळाले हे अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबईतील विक्रोळी परिसरातून दीपक चणचण सिंग खैनाल याला बुधवारी अटक केली. हे पिस्टल दीपकने पंजाबमधून मागविल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीकडून 40 हजारांचे चरस, वजनकाटा आणि प्लॅस्टिक पिशव्या असा मुद्देमालही जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT