Chembur Accident: कामाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला; 5व्या मजल्यावरून पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

नथुराम यांचा कामावरचा हा पहिलाच दिवस होता.
Chembur Accident
Chembur AccidentPudhari
Published on
Updated on

मुंबई: चेंबूर येथील एका दुर्दैवी अपघातात नथुराम साखविलकर (वय 52, रा. घाटला, चेंबूर) या सुरक्षारक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला. सुभाषनगर येथील इमारत क्रमांक 10 मध्ये वैभव लक्ष्मी डेव्हलपर्सच्यामार्फत पुनर्विकासाचे काम सुरू असताना पार्किंगच्या पाचव्या मजल्यावरून पडून ही घटना घडली आहे. नथुराम यांचा कामावरचा हा पहिलाच दिवस होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नथुराम हे इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते. सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ते इमारतीतील एलिव्हेटर पार्किंग सिस्टीमची पाहणी करीत होते. यावेळी पार्किंगच्या पाचव्या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवरून त्यांचा तोल गेला आणि ते थेट तळमजल्यावरील मोकळ्या जागेत कोसळले.

Chembur Accident
Political News: विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचा पाठिंबा: शरद पवार

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने साखविलकर यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news