Combing Operation Pudhari
मुंबई

Combing Operation: नवी मुंबई पोलिसांचे एकाचवेळी सहा ठिकाणी कोम्बिंग; ७ आफ्रिकन अटकेत

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत ८ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे: नवी मुंबई पोलिसांनी सहा ठिकाणी एकाच वेळेस कोम्बिंग ऑपरेशन राबवले. हे ऑपरेशन अनधिकृत राहणाऱ्या आफ्रिका खंडातील नागरिकांच्या शोधार्थ राबवण्यात आले होते. यात सात नागरिक आढळून आले. त्यापैकी दोघांच्या व्हिसाची मुदत संपलेली होती.

कोपरखैरणेत बिरा लायडिया ( पारपत्र गुन्हा अगोदरच दाखल ), खारघर गोडवीन आम्यूनल ( अमली पदार्थ विरोधी कलमन्वये यापूर्वीच गुन्हा दाखल ), उलवा इकेचूऊ पौल ( याचा एका भारतीय महिलेशी विवाह ), पनवेल - फिलिप फ्रँसीस ( भारतीय महिलेशी विवाह) खारघर लोतांना ओकेडो, तळोजा - ऍंथोनी नायमेका ( अमली पदार्थ कलमन्वये गुन्हा दाखल ) तळोजा मेर्सी ओकेझि (महिला ) आणि वाशी क्वीन लाईन ऑनूओह (महिला ) असे अटक आरोपींची नावे आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत ८ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कारवाईदरम्यान ७ पुरुष व २ महिला असे एकूण ९ आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यापैकी ५ आफ्रिकन नागरिकांविरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत.

२ आफ्रिकन नागरिक भारतात व्हिसा मुदत संपल्यानंतरही वास्तव्यास असल्याचे आढळून आले. २ आफ्रिकन नागरिकांनी भारतीय महिलांशी विवाह केलेला आहे. तसेच ज्या घरमालकांनी आफ्रिकन नागरिकांना घर देताना कायद्याचे पालन केले नाही अशा २ घरमालकांविरुद्ध तळोजा व खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मिलींद भारंबे, पोलीस सहआयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त, प्रमोद शेवाळे व पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ यांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात विशेष कोंबींग ऑपरेशन राबविण्याबाबत आदेश दिले होते.

त्याअनुशंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाशी, कोपरखैरणे, खारघर व तळोजा हद्दीत परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात विशेष कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. यात ७ पुरुष व २ महिला अशा एकुण ९ आफ्रिकन नागरिकांची पडताळणी करण्यात आली.

पडताळणी दरम्यान ५ आफ्रिकन नागरिकांविरूध्द अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे व २ आफ्रिकन नागरिक भारतात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरूध्द डिपोर्टेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याशिवाय आफ्रिकन इसम नामे ऊमुन्ना अंदुबिसी विलिएम्स तो खारघर मेट्रो स्टेशन, सेक्टर-३६ येथे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली होती. बातमीप्रमाणे सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडून सुमारे ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन व कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याच्याविरूध्द खारघर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास खारघर पोलीस ठाणे करत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त, धर्मपालं बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, यांच्या नेतृतखाली पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT