नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीमुंबई आणि दुबई वर्ल्ड सेंटर दरम्यान एफकॉम कार्गोद्वारे नियोजित मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. पश्चिम आशिया आणि जागतिक बाजारपेठेशी नवी मुंबई विमानतळाची जोडणी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुबई हे जागतिक पातळीवरील प्रमुख लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सशिपमेंट हब असल्याने या नव्या कनेक्शनमुळे भारतीय व्यापाऱ्यांना जीसीसी देश, आफ्रिका, युरोप आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश मिळेल.
ही सेवा विशेषतः ई-कॉमर्स शिपमेंट, अभियांत्रिकी वस्तू, फार्मास्युटिकल्स, सामान्य माल आणि नाशवंत वस्तूंसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.मुंबई महानगर प्रदेशासाठी मुख्य 'कार्गो गेटवे'आधुनिक पायाभूत सुविधा आणि एकात्मिक लॉजिस्टिक यंत्रणेमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वेगवान आणि कार्यक्षम मालवाहतूक हाताळणीसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
आठवड्यातून तीन उड्डाणे
नव्या सेवेअंतर्गत विमान कंपनी दर आठवड्यास तीन मालवाहतूक उड्डाणे चालवणार आहे. ये प्रत्येक उड्डाणादरम्यान २० टन मालवाहतूक केली जाईल. यामुळे भारत-पश्चिम आशिया व्यापार कॉरिडॉरवर निर्यातदार, आयातदार, मालवाहतूक अग्रेसर आणि लॉजिस्टिक पुरवठादारांना एक विश्वासार्ह आणि अतिरिक्त हवाई मालवाहतूक क्षमता उपलब्ध होईल.